Batla House Encounter Case : दहशतवादी आरिज खानला फाशीची शिक्षा, दिल्लीच्या साकेत कोर्टाचा मोठा निकाल

| Updated on: Mar 15, 2021 | 8:03 PM

राजधानी दिल्लीमध्ये 2008 साली झालेल्या बाटला हाऊस एन्काऊंटर केसनंतर आरिज खान फरार झाला होता. त्याला 2018 मध्ये नेपाळमधून अटक करण्यात आली होती.

Batla House Encounter Case : दहशतवादी आरिज खानला फाशीची शिक्षा, दिल्लीच्या साकेत कोर्टाचा मोठा निकाल
Follow us on

नवी दिल्ली : बाटला एन्काऊंटर केस प्रकरणात आरिज खानला फासीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने ही केस रेयरेस्ट ऑफ रेयर असल्याचं म्हटलंय. दिल्लीच्या साकेत कोर्टाने 8 मार्च रोजी दोषी मानलं होतं. राजधानी दिल्लीमध्ये 2008 साली झालेल्या बाटला हाऊस एन्काऊंटर केसनंतर आरिज खान फरार झाला होता. त्याला 2018 मध्ये नेपाळमधून अटक करण्यात आली होती.(Terrorist Arij Khan convicted in Batla House encounter case sentenced to death)

बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणात पोलीस अधिकारी मोहन चंद शर्मा यांचा मृत्यू झाला होता. तर पोलीस कर्मचारी बलवंत सिंह राजवीरच्या हत्येचाही प्रयत्न झाला होता. बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणात यापूर्वी आरोपी शहजाद अहमदला 2013 मध्ये शिक्षा सुनावण्यात आली होती. तर त्याचे 2 साथीदार आतिफ आमीन आणि मोहम्मद साजिद मारले गेले होते.

इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिज खानला साकेत कोर्टानं दोषी ठरवलं होतं. 15 मार्च रोजी शिक्षा सुनावली जाणार असल्याचंही कोर्टानं जाहीर केलं होतं. आरिज खानला कलम 302, 307 आणि आर्म्स अॅक्टनुसार दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर आज त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कोण आहे दहशतवादी आरिज खान ?

आरिज खान हा 2008 मधील दिल्ली-जयपूर-अहमदाबाद आणि यूपीतील न्यायालयात जे बॉम्बस्फोट झाले होते. त्यातील मुख्य सूत्रधारांमध्ये आरिज खानचं नाव होतं. या बॉम्बस्फोटानंतर आरिज खानची माहिती देणाऱ्यास तब्बल 15 लाख रुपयांचं बक्षिस ठेवण्यात आलं होतं. तसंच त्याच्याविरोधात इंटरपोलद्वारे रेड कॉर्नर नोटीसही जाहीर करण्यात आली होती. मूळचा आझमगढचा रहिवासी असलेला आरिज खान उर्फ जुनैदला स्पेशल सेलच्या टीमने फेब्रुवारी 2018 मध्ये अटक केली होती.

नेमकं प्रकरण काय?

13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीतील अनेक भागांमध्ये सिरियल बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात 26 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. तर 133 नागरिक जखमी झाले होते. या हल्ल्यामागे इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला 19 सप्टेंबर 2008 रोजी या हल्ल्याच्या कट रचणाऱ्या अतिरेक्यांसंबंधित महत्त्वाची माहिती मिळाली.

इंडियन मजाहिद्दीनचे 5 अतिरेकी दिल्लीतील बाटला हाऊस येथील बिल्डिंग L-18 च्या फ्लॅटमध्ये लपून बसले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या पाच अतिरेक्यांमध्ये आरिज खान, आतिफ अमीन, मोहम्मद साजिद, मोहम्मद सैफ आणि शहजाद अहमद यांचा समावेश होता. 13 सप्टेंबर 2008 रोजी इन्सपेक्टर मोहन चंद शर्मा जेव्हा आपली टीमला घेऊन बाटला हाऊसला पोहोचले तेव्हा पोलीस आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत मोहन चंद शर्मा शहीद झाले. मोहन चंद शर्मा यांच्या हत्येप्रकरणी कोर्टाने याआधी शहजाद अहमदला दोषी घोषित करण्यात आलं होतं.

इतर बातम्या :

1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गांवरुन प्रवास करणं महागणार

NOTAला जास्त मते मिळाल्यास निवडणूक रद्द करा; सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस

Terrorist Arij Khan convicted in Batla House encounter case sentenced to death