1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गांवरुन प्रवास करणं महागणार

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) टोल दरात 5 टक्क्यांनी वाढ करणार आहे. यासह मासिक पासच्या किंमतीही 10 ते 20 रुपयांनी वाढू शकतात.

1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गांवरुन प्रवास करणं महागणार
कोविड 19 मुळे सामाजिक अंतर राखण्यासाठी एक नवीन नियम बनले आहेत. टोल ऑपरेटर आणि वाहने प्रवाशांच्या संपर्कात येऊ नयेत म्हणून FASTag च्या वाढत्या वापरासह त्याचेही सहज पालन केले जात आहे.
अक्षय चोरगे

|

Mar 15, 2021 | 4:44 PM

नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणं 1 एप्रिलपासून महागणार आहे. कारण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) टोल दरात 5 टक्क्यांनी वाढ करणार आहे. यासह मासिक पासच्या किंमतीही 10 ते 20 रुपयांनी वाढू शकतात. एनएचएआय (National Highways Authority of India) प्रत्येक आर्थिक वर्षात टोल टॅक्स वाढवते. FASTag च्या टोल टॅक्समध्ये वाढ केल्याने सर्वसामान्यांपासून ते ट्रांसपोर्टर्सपर्यंत सर्वांना याचा फटका बसणार आहे. (Driving on National highways will be more expensive from 1st April)

मिळालेल्या वृत्तानुसार गोरखपूरमधील तीन टोल प्लाझांवरील टोल दर 5 ते 30 रुपयांनी वाढणार आहेत. नयनसार, टेनुआ आणि शेअरपूर चामराह येथील टोल वसुलीच्या आधारे अधिकारी लवकरच टोल दर वाढविण्याचा प्रस्ताव पाठवणार आहेत. याद्वारे मासिक टोलमध्येही 10 ते 20 रुपयांची वाढ होणार आहे, त्यामुळे राष्ट्रीय महामार्गांवरुन ये-जा करणाऱ्या लोकांचा खर्च वाढू शकतो. NHAI गोरखपूर झोन प्रकल्प संचालक सीएम द्विवेदी म्हणाले की, “टोल टॅक्स प्रत्येक आर्थिक वर्षात वाढतो. नवीन दर 1 एप्रिलपासून लागू होणार असून हा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.”

FASTag द्वारे दरवर्षी 20,000 कोटी रुपयांची बचत होणार

FASTag इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली टोल प्लाझावरील प्रतीक्षा कालावधी (वेटिंग टाईम) कमी करते, असा दावा केला जात आहे. तसेच यामुळे इंधनाचा वापर कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, राष्ट्रीय महारामार्गांवरुन धावणाऱ्या सर्व वाहनांनी FASTag चा वापर सुरु केला तर दरवर्षी भारतात पेट्रोल आणि डिझेलवर 20,000 कोटी रुपयांची बचत होईल.

16 फेब्रुवारीपासून FASTag अनिवार्य

देशात 16 फेब्रुवारीपासून FASTag सर्व वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानंतर टोल वसुलीत प्रचंड वाढ झाली आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) च्या म्हणण्यानुसार, फास्टॅगमुळे टोल वसुली 104 कोटींवर गेली आहे.

Fastag म्हणजे काय?

वाहनाच्या विंडो स्क्रीनला लावलेल्या स्टिकरला फास्टॅग म्हणतात. याचे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारा वापर करते. ते थेट टोल नाक्यावरील स्कॅनरला कनेक्ट असंत. त्यामुळे तुमच्या अकाऊंटमधील पैसे कापले जातात. अशा वेळी तुमच्या गाडीला फास्टॅग लावलेला असेल तर कोणत्याही विलंबाशिवाय तुम्ही टोलनाक्यावरून निघून जाऊ शकता. हे फास्टॅग तुम्ही तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी जोडू शकता. त्यामुळे जिथे टोल भरण्याची गरज आहे, त्या टोल नाक्यावर तुमच्या अकाऊंटमधून आपोआप पैसे कट होतात.

Fastag कोणत्या गाड्यांना बसवावा लागणार?

जर आपल्या गाडीची नंबर प्लेट पांढऱ्या कलरची असेल तर तुम्हाला फास्ट टॅग बसवावाच  लागेल. जर तुमच्या गाडीला फास्ट टॅग नसेल तर तुम्ही टोला प्लाझा क्रॉस करु शकत नाही. तसंच जर पिवळ्या नंबर प्लेटची गाडी असेल तर ट्रक असो वा कॅब तुम्हाला Fastag बसवावाच लागेल. दुचाकींना मात्र फास्ट टॅगची काहीही गरज नसेल.

कसा खरेदी कराल फास्ट टॅग?

फास्ट टॅग देशभरातील कोणत्याही टोल बुथवर खरेदी करता येते. फास्ट टॅग खरेदी करण्यासाठी तुमच्या गाडीच्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्ससह आयडीची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, पेटीएम पेमेंट्स बँक आणि आयडीएफसी फर्स्ट आदि बँकांसह 22 बँकांमधून खरेदी करु शकता. याशिवाय पेटीएम, अमेझॉन आणि फ्लिपकार्डसारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरही तुम्ही फास्ट टॅग खरेदी करु शकता. अनेक बँकांनी आपल्या मोबाईल अॅपवर फास्ट टॅग खरेदीवर डिस्काऊंट, एक्सक्लुसिव्ह ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर दिले आहे.

किती आहे फास्ट टॅगची किंमत?

फास्ट टॅगची किंमत दोन बाबींवर अवलंबून आहे. तुमच्याकडे वाहन कोणते आहे आणि तुम्ही कुठून फास्ट टॅग खरेदी करता यावर त्याची किंमत अवलंबून आहे. इश्यू फी आणि सिक्युरिटी डिपॉझिटची किंमत प्रत्येक बँकेची वेगळी असू शकते. फास्ट टॅग तुम्ही घरबसल्या खरेदी करु शकता.

संबंधित बातम्या

…तर वाशीच्या टोलनाक्यावर दुप्पट पैसे भरावे लागणार

‘या’ खास व्यक्तींना FASTag रिचार्जच करावा लागणार नाही!

तुमच्या गाडीवर लावलेला FASTag खरा की खोटा, कसे ओळखाल?

FASTag कडून टोलवर कट झाले जास्त पैसे? नो टेन्शन, आता Paytm देणार रिफंड

(Driving on National highways will be more expensive from 1st April)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें