AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या गाडीवर लावलेला FASTag खरा की खोटा, कसे ओळखाल?

त्यामुळे वाहनाधारकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन NHAI ने केले आहे. (NHAI Warn about FASTag Fraud)

तुमच्या गाडीवर लावलेला FASTag खरा की खोटा, कसे ओळखाल?
FASTag
| Updated on: Mar 07, 2021 | 9:13 PM
Share

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व गाड्यांना Fastag अनिवार्य केले आहे. मात्र काही ठिकाणी बनावट फास्टॅगची विक्री सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या फास्टॅगची ऑनलाईन विक्री केली जात आहे. त्यामुळे वाहनधारकांना अनावश्यक भुर्दंड लागण्याची शक्यता आहे. (NHAI Warn about FASTag Fraud Fake FASTag)

NHAI ने दिलेल्या माहितीनुसार, फास्टॅग सक्तीच्या पार्श्वभूमीवर बनावट फास्टॅगही बाजारात आणण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे FASTag जरी बनावट असले तरी ते हुबेहुब दिसतात. त्यामुळे वाहनाधारकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन NHAI ने केले आहे.

FASTag खरा की खोटा, असे ओळखा?

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर बनावट फास्टॅगबाबत इशारा देण्यात आला आहे. ‘वैध ऑनलाइन फास्टॅग घेण्यासाठी www.ihmcl.co.in या संकेतस्थळावर किंवा MyFAStag app येथे संपर्क साधावा. यासोबत अधिकृत बँका, बँकेच्या संकेतस्थळावरून किंवा अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावेत. याची यादी ihmcl च्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. तसेच अधिक माहितीसाठी प्राधिकरणाचा हेल्पलाइन क्रमांक 1033 यावर संपर्क साधावा किंवा etc.nodal@ihmcl.com येथे संपर्क साधा, अशी सूचना प्राधिकरणाने अधिकृत संकेतस्थळावर केली आहे.

बनावट फास्टॅगमुळे स्कॅन न होणे, पैसे वजा न होणे असे प्रकार घडतात. फास्टॅगच्या रांगेत असल्याने वाहनचालकांना डबल टोल भरावा लागतो. फास्टॅगसाठी आधीच पैसे मोजलेले असल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. यामुळे टोलनाक्यावर वादाचे प्रसंगही पाहायला मिळतात. (NHAI Warn about FASTag Fraud Fake FASTag)

…तर दुप्पट टॅक्स भरावा लागेल

जर तुमच्या गाडीवर फास्ट टॅग लावले नसेल तुम्हाला मार्शल लेनमध्ये प्रवेश मिळणार नाही. मात्र जर तुम्ही फास्ट टॅगच्या लेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्या गाडीचा जेवढा टॅक्स असेल त्याच्या दुप्पट टॅक्स भरावा लागेल.

कसे खरेदी कराल फास्ट टॅग?

फास्ट टॅग देशभरातील कोणत्याही टोल बुथवर खरेदी करता येते. फास्ट टॅग खरेदी करण्यासाठी तुमच्या गाडीच्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्ससह आयडीची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, पेटीएम पेमेंट्स बँक आणि आयडीएफसी फर्स्ट आदि बँकांसह 22 बँकांमधून खरेदी करु शकता. याशिवाय पेटीएम, अमेझॉन आणि फ्लिपकार्डसारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरही तुम्ही फास्ट टॅग खरेदी करु शकता. अनेक बँकांनी आपल्या मोबाईल अॅपवर फास्ट टॅग खरेदीवर डिस्काऊंट, एक्सक्लुसिव्ह ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर दिले आहे.

किती आहे फास्ट टॅगची किंमत?

फास्ट टॅगची किंमत दोन बाबींवर अवलंबून आहे. तुमच्याकडे वाहन कोणते आहे आणि तुम्ही कुठून फास्ट टॅग खरेदी करता यावर त्याची किंमत अवलंबून आहे. इश्यू फी आणि सिक्युरिटी डिपॉझिटची किंमत प्रत्येक बँकेची वेगळी असू शकते. फास्ट टॅग तुम्ही घरबसल्या खरेदी करु शकता. (NHAI Warn about FASTag Fraud Fake FASTag)

संबंधित बातम्या : 

FASTag कडून टोलवर कट झाले जास्त पैसे? नो टेन्शन, आता Paytm देणार रिफंड

गाडीचा FASTag स्कॅन न झाल्यास काय कराल? ही झेरॉक्स जवळ ठेवा अन् फुकट प्रवास करा

Follow Us
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!