AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया आघाडीत मोठी फूट, नीतीश कुमार जाताच ‘या’ बड्या नेत्याचा स्वबळावर लढण्याचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी उभी राहिलेली इंडिया आघाडी फुटत चालली आहे. या आघाडीत आज पुन्हा फूट पडली. आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये इंडिया आघाडी एकत्रित लढणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत घरोबा केल्यानंतरची इंडिया आघाडीतील ही दुसरी मोठी फूट आहे.

इंडिया आघाडीत मोठी फूट, नीतीश कुमार जाताच 'या' बड्या नेत्याचा स्वबळावर लढण्याचा निर्णय
india allianceImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 10, 2024 | 5:44 PM
Share

नवी दिल्ली | 10 फेब्रुवारी 2024 : बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडल्यानंतर इंडिया आघाडीला पुन्हा एक मोठा झटका बसला आहे. इंडिया आघाडीत आणखी एक फूट पडली आहे. आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब लोकसभेच्या सर्वच्या सर्व 13 जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतानाच या उमेदवारांच्या नावाची घोषणा येत्या 15 दिवसात करणार असल्याचंही आपने जाहीर केलं आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील फुटीवर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे. तर, इंडिया आघाडीतील या फुटीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर कोणतंही तगडं आव्हान राहणार नसल्याचंही अधोरेखित झालं आहे.

देशभरात लोकसभा निवडणुकांची जोरात तयारी सुरू आहे. विरोधक आणि सत्ताधारी दोघांनीही आपआपली आघाडी मजबूत करण्यावर भर दिला आहे. इंडिया आघाडीत तर जागा वाटपावरूनच अजूनही मारामार सुरू आहे. आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी खन्ना येथे एका रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी भगवंत मान यांनी आम आदमी पार्टी पंजाबमधील लोकसभेच्या 13 आणि चंदीगडमधील एक अशा एकूण 14 जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं. तसेच या उमेदवारांच्या नावांची घोषणाही लवकर करण्यात येणार असल्याचं भगवंत मान यांनी सांगितलं.

आम्हीच जिंकू

पंजाबच्या खन्ना जिल्ह्यात ही रॅली झाली. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते होम डिलिव्हरी स्कीमची सुरुवात करण्यात आली. यावेळी मान यांनी चंदीगडसह पंजाबमधून आप सर्वच्या सर्व 14 जागा जिंकून येण्याचा विश्वास व्यक्त केला. आमच्याच पारड्यात सर्व जागा येतील. विरोधकांना एकही जागा मिळणार नाही, असा दावाही मान यांनी केला.

लोकसभा निवडणुकीसाठी पक्षांतर्गत बैठका होतील. त्यात उमेदवारांची नावे ठरवली जाईल. ही नावे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केली जातील. पंजाबच्या लोकांनी पारंपारिक राजकीय पक्षांचा सुपडा साफ केला आहे. त्यांचा अहंकार चिरडून टाकला आहे. जो काही अहंकार राहिला असेल तो या लोकसभा निवडणुकीत चिरडला जाईल, असंही भगवंत मान म्हणाले.

भाजपचा टोला

दरम्यान, इंडिया आघाडीत फूट पडल्याने त्यावर भाजपने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इंडिया आघाडीला आणखी एक झटका बसला आहे. केजरीवाल यांनी सर्व जागा लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. याचा अर्थ या ठिकाणी इंडिया आघाडी निवडणूक लढणार नाही. इंडिया आघाडी कोसळत आहे. या आघाडीचं कोणतंही मिशन नाही. कोणतंही ध्येय नाही. व्हिजन नाही. फक्त कमिशन, भ्रष्टाचार, भ्रम आणि विरोधाभासाची परिस्थिती आहे. राहुल गांधींची न्याय यात्राही विचित्र आहे. ती न्याय यात्रेऐवजी बाय बाय यात्रा अधिक वाटत आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजादा पूनावाला यांनी केली आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.