भैय्यू महाराजांनी जानेवारीतच आत्महत्येचा प्रयत्न केला होता : सेवक

सचिन पाटील

सचिन पाटील | Edited By:

Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

इंदूर : संत भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. भैय्यू महाराजांनी जानेवारीतच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांनी हाताची नस कापून घेण्याचाही प्रयत्न केला होता, पण वेळीच रोखल्याने त्यांनी आत्महत्या केली नाही, असा दावा सेवक प्रवीण घाडगेने केलाय. या दाव्यानंतर पुन्हा एकदा प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. भय्यू महाराज कौटुंबीक वादातून आत्महत्या […]

भैय्यू महाराजांनी जानेवारीतच आत्महत्येचा प्रयत्न केला होता : सेवक

इंदूर : संत भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. भैय्यू महाराजांनी जानेवारीतच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांनी हाताची नस कापून घेण्याचाही प्रयत्न केला होता, पण वेळीच रोखल्याने त्यांनी आत्महत्या केली नाही, असा दावा सेवक प्रवीण घाडगेने केलाय. या दाव्यानंतर पुन्हा एकदा प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.

भय्यू महाराज कौटुंबीक वादातून आत्महत्या करणार होते. महाराजांचे सेवक प्रवीण घाडगेने महाराजांच्या हातून रिव्हॉल्व्हर हिसकावून ती लपवून ठेवली होती. भैय्यू महाराज ती शोधत असल्याचं सांगून महाराजांची पत्नी आयुषीने रिव्हॉल्व्हरची विचारणा केली. त्यानंतर रिव्हॉल्वर कुठे लपवलीय ते सांगितलं आणि भैय्यू महाराजांनी 15 दिवसांनंतर आत्महत्या केल्याचा दावा या सेवकाने केलाय. पाहाइंदूर : पत्नीच्या त्रासामुळे भैय्यूजी महाराजांची आत्महत्या- सेवकाचा दावा

आत्महत्येच्या आधी 15 दिवस आयुषी यांनी रिव्हॉल्वरबद्दल विचारणा केली होती. गुजरात दौऱ्यावर जात असल्यामुळे भैय्यू महाराजांना रिव्हॉल्वर हवी आहे, असं आयुषी यांनी मला सांगितल्याचा दावा प्रविण घाडगेने केलाय. आयुषी यांनी विचारल्यानंतरच आपण रिव्हॉल्वर कुठे लपवून ठेवली याबद्दल सांगितल्याचंही त्याने कबूल केलं. वाचातरुणीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून भैय्यू महाराजांची आत्महत्या?

रिव्हॉल्वर दिली नसती तर भैय्यू महाराज वाचले असते अशी खंत या सेवकाने व्यक्त केली आहे. भैय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणातील सर्वात मोठा महत्त्वाचा साक्षीदार सर्वप्रथम टिव्ही 9 वर आल्यानंतर आता एका मागोमाग एक धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत.

काय आहे भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरण

भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वतःच्या बंदुकीतून गोळी घालून आत्महत्या केली होती. भय्यू महाराजांची मुलगी आणि दुसरी पत्नी डॉ. आयुषी यांचं पटत नव्हतं. पण दोघी पहिल्यांदाच एकत्र आल्या आहेत. महाराजांनी घरगुती कारणांमुळे आत्महत्या केली नाही. त्यांना घर, गाडी, बंगला आणि कोट्यवधी रुपयांच्या मागणीसाठी ब्लॅकमेल केलं जात होतं, याची चौकशी व्हायला हवी. सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेला चालक कैलास पाटील याच्याकडे सगळी माहिती आहे. सेवक विनायक, शरद देशमुख आणि तरुणीकडून रचण्यात आलेल्या कटाची सर्व माहिती त्याच्याकडे आहे, असं या मायलेकींनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI