AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरातमध्ये भूपेंद्र पटेलांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, सत्ता टिकवण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान

भूपेंद्र पटेला यांना ना सरकारचा ना प्रशासनाचा अनुभव आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'काम दाखवा अन्यथा घरी जा' या न्यायानंच काम करत असल्यानं भूपेंद्र पटेल यांची येत्या वर्ष-सव्वा वर्षात कसोटी लागेल.

गुजरातमध्ये भूपेंद्र पटेलांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, सत्ता टिकवण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान
Bhupendra Patel
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 11:01 PM
Share

अहमदाबाद : भूपेंद्र पटेल यांनी आज गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गुजरातमध्ये सव्वा वर्षात निवडणुका होत असून सरकारची प्रतिमा सुधारण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असेल. मंत्रिपदाचा कसलाही अनुभव नसताना थेट मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागल्यानं पटेल यांचा कस लागणार आहे. आमदार भूपेंद्र पटेल थेट मुख्यमंत्री बनले. देशावर राज्य करणाऱ्या मोदी-शाहांच्या राज्याची सूत्रं एकदम नवख्या माणसाच्या हाती पडलीयत. 59 वर्षांच्या भूपेंद्र पटेल यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद हा काटेरी मुकुटच आहे. (Bhupendra Patel took oath as the Chief Minister in gujarat, a big challenge for the BJP to stay in power)

भूपेंद्र पटेला यांना ना सरकारचा ना प्रशासनाचा अनुभव आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘काम दाखवा अन्यथा घरी जा’ या न्यायानंच काम करत असल्यानं भूपेंद्र पटेल यांची येत्या वर्ष-सव्वा वर्षात कसोटी लागेल. मावळते मुख्यमंत्री विजय रुपानी मृदु स्वभावाचे होते. प्रशासनावर हुकूमत गाजवण्यापेक्षा प्रशासनाकडून काम करुन घेण्याची त्यांची पद्धत होती. त्यामुळं गुजरातेत मंत्री व नेत्यांपेक्षा अधिकाऱ्यांचीच चलती होती. आता ही चलती मोडून काढण्याचं पहिलं काम भूपेंद्र पटेलांना करावं लागेल. गुजरातमध्ये सव्वा वर्षात निवडणुका होतायत. गेल्या तीन निवडणुकांवर नजर टाकली तर भाजपला या निवडणुका किती आव्हानात्मक आहेत हे दिसून येईल.

मतांची टक्केवारीसुद्धा भाजपसाठी चिंतेचा विषय

2007 च्या निवडणुकीत भाजपला 117, 2012 ला 115 आणि 2017 ला 99 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे तिन्ही निवडणुकांत वरचेवर पिछेहाट दिसत आहे. प्रतिस्पर्धी काँग्रेसला 59, 61 आणि 77 अशा चढत्या क्रमानं जागा मिळत गेल्या. मतांची टक्केवारीसुद्धा भाजपसाठी चिंतेचा विषय आहे. 2007 ला 49.12 टक्के, 2012 ला 47.85 टक्के आणि 2017 ला 49.1 टक्के मतं मिळाली. भाजपची वोट बँक फ्रीज झाल्यासारखी आहे. मतदान तेवढंच आहे, पण जागा घटत आहेत. दुसरीकडं काँग्रेसला 38 टक्के, 38.93 टक्के आणि 41.1 टक्के मतं मिळाली आहेत. ही आकडेवारी बघितल्यावर भाजपनं सव्वा वर्ष आधीच निवडणुकीची तयारी कशी सुरु केलीय हे कळेल.

गेल्या 6 महिन्यांत भाजपनं 4 राज्यांतले 5 मुख्यमंत्री बदलले

2017 ला भाजपचे 99 पैकी 16 आमदार 5 हजारांपेक्षा कमी मताधिक्क्यानं जिंकले होते. 2022 मध्ये या जागांवर अँटी इनकम्बन्सीचा फटका बसेल अशी भिती भाजपला आहे. 2017 च्या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भाजप जिंकलेल्या 18 जागी तिसऱ्या नंबरच्या उमेदवाराला मिळालेली मतं ही मताधिक्क्यापेक्षा जास्त आहेत. या जागाही भाजपची डोकेदुखी वाढवणाऱ्या आहेत. गुजरातमध्ये भाजपला काँग्रेससोबत आम आदमी पार्टीचेही आव्हान वाटत आहे. मोदी लाटेच्या जोरावर अनेक राज्यांत मिळवलेली सत्ता टिकवणं भाजपला कठीण जात आहे. त्यामुळंच की काय गेल्या 6 महिन्यांत भाजपनं 4 राज्यांतले 5 मुख्यमंत्री बदललेत.

भाजपला वोटबँकेच्या पलीकडची मतं मिळवण्यासाठी कष्ट करावे लागणार

यामध्ये आधी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवालांना बदलले. त्यानंतर उत्तराखंडमध्ये तीरथसिंह रावत आणि त्रिवेंद्रसिंह रावत या दोन मुख्यमंत्र्यांना खुर्ची गमवावी लागली. उत्तराखंडनंतर कर्नाटकात येडीयुरप्पांच्या जागी बोम्मई यांच्याकडं राज्याची सूत्रं देण्यात आली. कर्नाटकानंतर गुजरातच्या विजय रुपान यांना अचानक मुख्यमंत्रीपद सोडण्यास सांगण्यात आलं. गुजरातमध्ये मुख्यमंत्री झालेले भूपेंद्र पटेल हे पाटीदार समाजाचे आहेत. या पटेल-पाटीदारांची गुजरातेत 20 टक्के लोकसंख्या आहे. भाजपला वोटबँकेच्या पलीकडची मतं मिळवण्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत. (Bhupendra Patel took oath as the Chief Minister in gujarat, a big challenge for the BJP to stay in power)

इतर बातम्या

बिल्डर ते लीडर, भूपेंद्र पटेलांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, नितीन पटेल म्हणाले, मान सन्मान महत्वाचा !

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन, वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.