AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोले बाबांच्या सत्संगदरम्यान मोठी दुर्घटना, मृतांचा आकडा पोहोचला 107 वर

भोले बाबांच्या सत्संगाच्या समारोपाच्या वेळी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे, योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदतकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

भोले बाबांच्या सत्संगदरम्यान मोठी दुर्घटना, मृतांचा आकडा पोहोचला 107 वर
| Updated on: Jul 02, 2024 | 7:38 PM
Share

Hathras Stampede Updates : भोले बाबांच्या सत्संगादरम्यान मोठी दुर्घटना घडलीये. सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 107 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. मृतांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत शंभरहून अधिक लोक गंभीर जखमी आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. सीएम योगी यांनी मृतांबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना ताबडतोब रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिलेत. एडीजी आणि आयुक्त यांना घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य सचिव मनोज कुमार सिंह आणि डीजीपी प्रशांत कुमार हाथरसला रवाना झाले आहेत.

भोले बाबाचा प्रवचनाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी

हातरस येथील सिकंदरराव कोतवाली भागातील फुलराई गावात भोले बाबाचा प्रवचनाचा कार्यक्रम सुरू होता. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने एकच गोंधळ उडाला. एका अंदाजानुसार 1.25 लाख लोक या सत्संगसाठी आले होते. गर्दीमुळे लोकांचे हाल होऊ लागले. उन्हामुळे लोक बेशुद्ध झाले आणि नंतर चेंगराचेंगरी झाली. लोक जमिनीवर पडले तेव्हा इतर लोक त्यांना चिरडून बाहेर येऊ लागले. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शेकडो गंभीर लोकांना रुग्णालयात दाखल केलंय.

सर्वत्र दिसत आहेत मृतदेह

हाथरसमधील परिस्थिती अजूनही नियंत्रणात नाही. सर्वत्र मृतदेह दिसत आहेत. मृतदेहांची मोजणी करणेही कठीण झाले आहे. जखमी लोकही सातत्याने रुग्णालयात दाखल केले जात आहेत. रुग्णवाहिकांची गर्दी दिसतेय. जवळपासच्या जिल्ह्यातील डॉक्टरांनाही येथे पाचारण करण्यात आले आहे. औषध आणि ग्लुकोजचा साठा मागवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हातरस चेंगराचेंगरीतील मृतांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. 24 तासांत चौकशी अहवाल मागवला आहे. कार्यक्रम आयोजकांवर एफआयआर दाखल करून मोठी कारवाई करण्याच्या तयारीत प्रशासन आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.