AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारताला संयुक्त राष्ट्र संघाचा मोठा धक्का; अमेरिका, इराण युद्धादरम्यान गंभीर आरोप, थेट इस्त्रायलसोबत…

अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे, एकीकडे या युद्धामुळे जगभरात मोठा तणाव निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्र संघाचा एक रिपोर्ट समोर आला आहे, या रिपोर्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! भारताला संयुक्त राष्ट्र संघाचा मोठा धक्का; अमेरिका, इराण युद्धादरम्यान गंभीर आरोप, थेट इस्त्रायलसोबत...
United NationsImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 21, 2026 | 4:10 PM
Share

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये प्रचंड तणाव पहायला मिळत आहे. इराण आणि अमेरिका आमने-सामने आहेत. सोमवारी अमेरिकेनं इराणचं एक जहाज ताब्यात घेतल्यानं इराण आता आणखी आक्रमक बनला आहे. दरम्यान हा युद्धविराम संपायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी पाकिस्तानमध्ये होणार होणार आहे. या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. मात्र दुसरीकडे आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाकडून भारताला मोठा धक्का बसला आहे. संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टमध्ये भारतावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

दैनिक भास्करने दिलेल्या एका वृत्तानुसार संयुक्त राष्ट्र संघाच्या एका रिपोर्टमध्ये भारतावर आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की, भारताचे इस्त्रायलसोबत असलेले संबंध आणि युद्धाला असलेला पाठिंबा या संदर्भात भारतावर कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे. ‘टॉर्चर अँण्ड जेनोसाइड’ नावाच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. हा रिपोर्ट संयुक्त राष्ट्र संघाच्या स्पेशल दूत फ्रांसेस्का अल्बनीज यांनी 23 मार्च रोजी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये सादर केला आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत. भारताचे इस्त्रायलसोबत खूप जवळचे संबंध आहेत, त्यामुळे भारत आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत आपल्या जबाबदारीचं उल्लंघन करत आहे, भारताला याची जबाबदारी घ्यावी लागू शकते असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी असा देखील दावा केला आहे की, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्त्रायलचे व्याप्त प्रदेशावरील नियंत्रण बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. तसेच विविध राष्ट्रांना इस्त्रायलसोबत शस्त्रास्त्रांचा व्यापार करण्यास देखील मनाई केली आहे. इस्त्रायलसोबत शस्त्रास्त्रांचा व्यापार थांबवण्याचं आवाहन न्यायालयाकडून करण्यात आलं आहे, मात्र असं असताना देखील भारताकडून इस्त्रायलसोबत शस्त्रास्त्रांचा व्यापार सुरू आहे, हा व्यापार आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करणारा ठरू शकतो, असं फ्रांसेस्का अल्बनीज यांनी म्हटलं आहे.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...