मोठी बातमी! अमेरिकेची दादागिरी संपली, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाड्या आवळल्या, आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, जगभरात खळबळ
मोठी बातमी समोर येत आहे, जगभरात टॅरिफ वॉर निर्माण करणाऱ्या आणि ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचं स्वप्न पहाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त धक्का बसला आहे. अमेरिकेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात टॅरिफ वॉर सुरू केलं आहे, त्यांनी भारतावर देखील 50 टक्के टॅरिफ लावला आहे. दरम्यान ते जगभरात टॅरिफ वॉर सुरू करूनच शांत बसले नाहीत तर त्यांनी त्यानंतर काही दिवसांपूर्वीच व्हेनेझुएलावर हल्ला करून व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना देखील अटक केली. दरम्यान त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला मोर्चा ग्रीनलँडकडे वळवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्यानं ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याची धमकी देण्यात येत आहे, तशा हालचाली देखील आता अमेरिकेत सुरू झाल्या आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे युरोपियन राष्ट्र आणि अमेरिकेमधील तणाव प्रचंड वाढला असून, युरोपियन राष्ट्रांनी अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. युरोपियन राष्ट्रांनी अमेरिकेविरोधात मोठं पाऊलं उचललं असून, ऐतिहासिक ट्रेड डील रद्द करण्यात आली आहे, हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
अमेरिकेचा ग्रीनलँडवर ताबा या धोरणाला विरोध करणाऱ्या युरोपियन राष्ट्रावर टॅरिफ लावण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा करताच अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांमधील तणाव शिगेला पोहोचला असून, आता युरोपियन राष्ट्रांनी मोठा निर्णय घेतला आहे, युरोपियन राष्ट्रांकडून ट्रांस अटलांटिक करार रद्द करण्यात आला आहे. या करारावर गेल्या वर्षी युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी सही केली होती. हा करार रद्द झाल्यामुळे आता अमेरिकेला सर्वात मोठा फटका बसणार आहे.
अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये तणाव
अमेरिकेने काही दिवसांपूर्वी व्हेनेझुएलावर हल्ला केला होता, डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली, दरम्यान अमेरिका केवळ व्हेनेझुएलावर हल्ला करूनच थांबली नाही तर आता ग्रीनलँडवर देखील ताबा मिळवण्याची अमेरिकेची महत्त्वकांक्षा आहे. मात्र अमेरिकेच्या या धोरणामुळे युरोपियन राष्ट्र आणि अमेरिकेमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. युरोपियन राष्ट्रांनी ऐतिहासिक करार रद्द करत अमेरिकेला सर्वात मोठा धक्का दिला आहे.
