भारतावर टॅरिफ लावणाऱ्या ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का; रशियानं केला मोठा गेम, सर्वात जवळच्या माणसानंच…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. रशियामधून मोठी बातमी समोर आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून आता भारतीय वस्तुंवर अमेरिकेकडून 50 टक्के टॅरिफ आकाराला जाणार आहे. याचा काही प्रमाणात भारताला फटका बसू शकतो, मात्र भारतानं अमेरिकेनं टॅरिफ लावल्यानंतर देखील रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे. भारतासाठी दिलासादायक बातमी म्हणजे एकीकडे टॅरिफमुळे अमिरेकेसोबत तणाव निर्माण झाला आहे, मात्र दुसरीकडे चीन आणि रशियासोबत जवळीक वाढत आहे. रशिया आणि चीनने देखील भारतीय वस्तूंचं आम्ही आमच्या बाजारपेठेत स्वागत करू असं म्हटलं आहे.
आता महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध थांबावं, युद्धविरामाची घोषणा व्हावी यासाठी ट्रम्प यांचा आटापिटा सुरू आहे. मात्र हे युद्ध यावर्षी तरी थांबणार नाही अशी बातमी समोर आली आहे, डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव विटकॉफ यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे हा ट्रम्प यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
विटकॉफ यांच्या मते ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे, त्यावरून असं वाटतं की हे युद्ध थांबू शकत नाही. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार दावा केला जात आहे की, लवकरच रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविरामाची घोषणा होईल, मात्र दुसरीकडे विटकॉफ यांच्याकडून असा दावा करण्यात आला आहे की, हे युद्ध आता थांबवू शकत नाही.
डोनाल्ड ट्रम्प युद्ध थांबावं यासाठी वारंवार रशिया आणि युक्रेनला धमकी देत आहेत, मात्र या धमकीचा कोणताही आसर या दोन्ही देशांवर होताना दिसून येत नाहीये, आता तर युक्रेननं आपल्याच देशात मिसाईल तयार करायला सुरुवात केली आहे. आम्ही तयार करत असलेले मिसाईल हे खूपच प्रभावशाली असल्याचा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. दरम्यान जर रशिया आणि युक्रेनमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविरामाची घोषणा झाली असती तर ट्रम्प यांची शांततेसाठी मिळणाऱ्या नोबेल पुरस्कारावरची दावेदारी आणखी मजबूत झाली असती, मात्र सध्या तरी ट्रम्प यांचं हे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाहीये.
