बिहारसाठी मोठे गिफ्ट, राजेंद्र सेतुला पर्यायी नवा पुल तयार, पीएम मोदी करणार उद्घाटन
पीएम मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी बिहार येथील गंगानदीवरील 1.865 किमी लांबीच्या सहा पदरी पुलाचे उद्घाटन होत आहे.जुन्या सात दशकापूर्वीच्या राजेंद्र सेतु यांच्या समांतर या नव्या पुलाची निर्मिती करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या जनतेला मोठे गिफ्ट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी NH-31 वर 8.15 किलोमीटर लांबीच्या औंटा-सिमरिया पुल योजनेचे उद्घाटन करणार आहेत. यात पवित्र गंगानदीवरील 1.865 किमी लांबीच्या सहा पदरी मार्गिकेच्या पुलाचा देखील समावेश आहे. या प्रकल्पाचे बजेट सुमारे 1,870 रुपये आहे. हा पुल मोकामा आणि बेगुसरायला थेट जोडणार आहे.
या पुलाला सात दशक जुन्या राजेंद्र सेतुच्या समांतर बांधण्यात आले आहे. जुन्या पुलांची अवस्था जर्जर झाली असून अवजड वाहने त्यावरुन धावू शकत नाही आणि हा पुल टाळून मोठा वळसा मारुन या वाहनांना प्रवास करावा लागतो. नव्या पुलामुळे ही अडचण दूर होणार असून वाहतूक कोडीं देखील टळणार आहे.
चांगली कनेक्टिविटी मिळणार
पाटणा जिल्ह्याच्या मोकामा आणि बेगुसरायच्या लोकांसाठी या नवीन पुलाचे वेगळेच महत्व असणार आहे. हा पुल उत्तर बिहार ( बेगुसराय, सुपौल, मधुबनी आणि अररिया ) आणि दक्षिण बिहार ( पाटणा, शेखपुरा, नवादा आणि लखीसराय आदी ) दरम्यान वेगवाना आणि सरळ संपर्क करण्यात मदत करणार आहे.तसेच हा पुल प्रसिद्ध तिर्थस्थळ सिमरिया धामला चांगली कनेक्टीविटी प्रदान करणार आहे. हा भारताचा सर्वात रुंद अतिरिक्त पुल ठरणार आहे.याचे डिझाईन आणि निर्मिती आधुनिक इंजिनिअरिंगचे उत्तर उदाहरण मानले जात आहे.
आर्थिक विकासाला प्रोत्साहन
हा पुल बिहारच्या आर्थिक विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल सिद्ध होईल. खास करुन उत्तर बिहारसाठी जो कच्चा मालासाठी द.बिहार आणि झारखंडवर अवलंबून आहे. तसेच हा पुल घरगुती उद्योग आणि व्यापाराला गतीही देणार आहे. जुन्या राजेंद्र सेतूची स्थिती खराब झाल्याने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या अवजड वाहनांनी उत्पादन बाजारपेठेत नेण्यासाठी अडचणी येत होत्या. परंतू या नवीन पुलाने हा प्रश्न सोपा झाला आहे. त्यामुळे हा पुल केवळ एक पुल नसून बिहारच्या आर्थिक विकासाचे माध्यम आहे.
बिहारच्या लोकांमध्ये उत्साह
या पुलांच्या निर्मितीमुळे बिहारची जनता खूप आनंदी झाली आहे.बेगूसराय निवासी राम कुमार सिंह यांनी सांगितले की पंतप्रधान सर्वसामान्य जनतेची खूप सेवा करत आहेत. हा पुल पाटणा आणि बेगुसराय जिल्ह्यांना जवळ आणणार आहे आणि लोकांना सोयी-सुविधा प्रदान करणार आहे. जुन्या जर्जर पुलामुळे ज्या वाहनांना वळसा घालून प्रवास करावा लागत होता तो वेळ आता वाचणार आहे.मोनू राज यांनी सांगितले की बेगुसराय ते पाटणा पोहचण्यासाठी 3 तांस लागायचे, परंतू आता 1.5 तासात पोहचता येणार आहे. ते म्हणाले की आता सिमरिया धाम येथे जादा पर्यंटक देतील.तसेच अन्य लोकांनीही पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
पुलाची निर्मिती करताना अनेक अडचणी
या योजनेवर काम करणारे NHAI अधिकारी एमएल योटकर यांनी सांगितले की योजनेसाठी आमच्या निर्मिती टीमला खुप साऱ्या अडचणींवर मात करावी लागली. हा एक सखल भाग असून येथे नेहमीच पुराचा धोका असतो. पुरामुळे दरवर्षी 7ते 8 महिनेच काम करता येत होते. पुरामुळे या क्षेत्रातील लोकांनी खूपच अडचणींचा सामना करावा लागतो. या पुलामुळे लोकांचा खूपच फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
