AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगावर मोठं संकट, 150 वर्षांनंतर पुन्हा ती हादरवणारी घटना घडणार, शास्त्रज्ञांनाही फुटला घाम, भारताबाबत सर्वात मोठी बातमी

मोठी बातमी समोर येत आहे, जग सध्या एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. यापूर्वी 1871 मध्ये असं संकट जगावर आलं होतं, त्यात अनेकांचे मृत्यू झाले, त्यानंतर आता पहिल्यांदाच 2027 मध्ये या संकटाची चाहुल लागली आहे.

जगावर मोठं संकट, 150 वर्षांनंतर पुन्हा ती हादरवणारी घटना घडणार, शास्त्रज्ञांनाही फुटला घाम, भारताबाबत सर्वात मोठी बातमी
Effect of El NinoImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 22, 2026 | 3:25 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, यंदा संपूर्ण जग एका मोठ्या भीषण संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे.एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. 1877-78 मध्ये अशीच घटना घडली होती, ज्या घटनेनं संपूर्ण जगात हाहाकार उडाला होता, त्याची पुनरावृत्ती 2027 मध्ये घडू शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. मोठ्या नैसर्गिक अपत्तीचे संकेत मिळत आहेत. जगभरातील हवामान तज्ज्ञांकडून यंदाच्या मान्सूनबाबत धडकी भरवणारा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदाच्या मान्सूनवर अल निनोचं सावट आहे. यंदाचा अल निनो एवढा शक्तिशाली आहे की, यापूर्वी अशी घटना 1877 मध्ये घडली होती. 1877 मध्ये संपूर्ण जगात भीषण दुष्काळ पडला होता, त्या वर्षभरात दुष्काळामुळे अनेक लोकांचे मृत्यू झाले. त्यानंतर पुन्हा अशा कोणत्याही दुष्काळाची नोंद झाली नाही. मात्र यावर्षी तशाच स्वरुपाच्या अल निनोचा प्रभाव पावसावर पडण्याचा अंदाज जगभरातील हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.

प्रशांत महासागरच्या पृष्ठभागाचं तापमान झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा तीव्र प्रभाव पहायला मिळू शकतो असा इशारा हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. यावर्षीचा अल निनो हा मेगा किंवा सुपर असू शकतो, अशी माहिती देखील हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. अल निनोची सुरुवात ही प्रशांत महासागरात होते, मात्र त्यानंतर त्याचा प्रभाव हा हळुहळू संपूर्ण जगावर पडतो. यंदा भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आणि मध्य अफ्रिका तसेच अमेझॉनचं संपूर्ण जंगल अल निनोच्या प्रभावाखाली येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे जगावर मोठं संकट निर्माण झालं आहे.

भारतावर काय परिणाम

यंदा देशात मान्सूनचं प्रमाण कसं राहणार? याबाबत भारतीय हवामान खात्याकडून (IMD) पहिला अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजामुळे चिंता वाढली आहे. यंदा भारतासह राज्यातील मान्सूनवर अल निनोचं सावट असणार आहे. याचा मोठा फटका हा पावसाला बसू शकतो. अल निनोमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे. दरम्यान संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तयारीला सुरुवात झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत संबंधित विभागांना आवश्यक त्या -सूचना करण्यात आल्या आहेत.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

Pune Mhada Lottery : म्हाडाची लॉटरी आली रे! स्वीमिंग पूल, पार्किंग ते जीम, वाचा 634 घरं नेमकी कुठं असणार?.

Pune Mhada Lottery : म्हाडाची लॉटरी आली रे! स्वीमिंग पूल, पार्किंग ते जीम, वाचा 634 घरं नेमकी कुठं असणार?

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं.

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?.

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?

Hockey News: विश्वचषकासाठी भारतीय हॉकी संघ जाहीर, अनुभवी हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपदाची जबाबदारी.

Hockey News: विश्वचषकासाठी भारतीय हॉकी संघ जाहीर, अनुभवी हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपदाची जबाबदारी

राहुल गांधी आणि अखिलेश यांना पोलिसांनी ताब्यात घेतले… ठिय्या आंदोलनाविरोधात पोलिस एक्शन मोडवर.

राहुल गांधी आणि अखिलेश यांना पोलिसांनी ताब्यात घेतले… ठिय्या आंदोलनाविरोधात पोलिस एक्शन मोडवर