AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तृणमूलचा बार काऊंसिलच्या निवडणुकीत दबदबा, भाजपाला किती जागा मिळाल्या?

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता, भाजपला मोठं यश मिळालं होतं. मात्र आता राज्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे.

तृणमूलचा बार काऊंसिलच्या निवडणुकीत दबदबा, भाजपाला किती जागा मिळाल्या?
Mamata BanerjeeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Aug 20, 2026 | 9:29 PM
Share

दोन महिन्यांपूर्वी पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये भाजपने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला. या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला तर तृणमूलला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच, तृणमूलमध्ये मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. तृणमूल जवळपास ममता बॅनर्जी यांच्य हातातून निसटल्याचं पहायला मिळत आहे. आधी आमदारांनी पक्षातून बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर 20 खासदार देखील पक्षातून फुटले, तृणमूलला अशाप्रकारे एकामागून एक झटके बसत असताना आता पक्षासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. भाजपला मोठा धक्का बसला आहे.

तृणमूल काँग्रेसने बार काउंसिलच्या निवडणुकीत आपला दबदबा पुन्ह एकदा कायम राखत, भाजपला धक्का दिला आहे. 23 जागांपैकी 15 जागा या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपला मात्र या निवडणुकीत पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. भाजपला या निवडणुकीत केवळ तीनच जागा जिंकता आल्या आहेत. बार काउंसिलच्या 23 जागांसाठी ही निवडणूक झाली, या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठं यश मिळालं आहे. बार काउंसीलच्या निवडणुकीत 23 पैकी 15 जागा जिंकून तृणमूलने सत्ता कायम ठेवली आहे, तर दुसरीकडे या निवडणुकीत भाजपला मात्र पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. भाजपला या निवडणुकीत केवळ तीनच जागा जिंकता आल्या आहेत. तर काँग्रेसला दोन जागा मिळल्या आहेत.

गेल्या निवडणुकीत काय होतं चित्र?

भाजपला गेल्या निवडणुकीत देखील तीनच जागा मिळाल्या होत्या, याही निवडणुकीत तीनच जागा मिळाल्या आहेत. मात्र यावेळची स्थिती वेगळी होती, कारण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला राज्यात मोठं यश मिळालं आहे. तृणमूल काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला होता. मात्र असं असताना देखील या निवडणुकीत भाजपचा फार काही प्रभाव पडू शकला नाही, भाजपच्या अवघ्या तीनच जगा निवडून आल्या आहेत, तर तृणमूलला या निवडणुकीत मोठं यश मिळालं असून, तृणमूल काँग्रेसचे उमदेवार 15 जगांवर विजयी झाले आहेत.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात