बिपरजॉय चक्रीवादळाबद्दल मोठी अपडेट, वादळ गुरुवारी सर्वात प्रभावी, गुजरात आणि राजस्थानला धोका

अरबी समुद्रात तयार झालेले बिपरजॉय वादळाचा वेग कमी झाला असला तरी त्याचा सर्वात जास्त प्रभाव गुरुवारी सकाळी जाणवेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पश्चिम रेल्वेने गुजरातला जाणाऱ्या-येणाऱ्या ट्रेन रद्द केल्या आहेत.

बिपरजॉय चक्रीवादळाबद्दल मोठी अपडेट, वादळ गुरुवारी सर्वात प्रभावी, गुजरात आणि राजस्थानला धोका
cyclone-biparjoy-gujarat
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jun 14, 2023 | 4:28 PM

मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळाचा वेग थोडा मंदावला आहे, आधी ते गुजरातच्या ( Biparjoy threat ) मांडवी- जाखू बंदराला ( Mandvi-Jakhau Port )    तडाखा देणार असे म्हटले जात होते. त्यामुळे गुजरातच्या किनारपट्टीवरील 40 हजार नागरीकांना हलविण्यात आले आहे. चक्रीवादळ गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने पाकिस्तानला ( Pakistan ) जाण्याचा अंदाज आहे. वादळाचा पुढे सरकण्याचा वेग कमी झाला असला तर गुरूवारी सकाळी त्याचा सर्वात जास्त प्रभाव जाणवेल, मांडवी- जाखू बंदरात लॅंड फॉल झाल्यानंतर राजस्थानला पावसाचा तडाखा बसणार असल्याचा इशारा मिळाला आहे. पश्चिम रेल्वेने ( Western Railway ) गुजरात मार्गे जाणाऱ्या आणि येणाऱ्या अनेक ट्रेन रद्द केल्या आहेत.

अरबी समुद्रात तयार झालेले बिपरजॉय वादळाचा वेग थोडा मंदावला असला तरी त्याचा सर्वात जास्त प्रभाव उद्या गुरुवारी सकाळी जाणवेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हे चक्रीवादळाचा वेग गेल्या सात तासात कमी झाला आहे. गुजरातच्या जोखू बंदरात त्याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. या दरम्यान त्याचा वेग दर ताशी 125-135 असण्याची शक्यता आहे. कदाचित नंतर त्याचा वेग वाढला तर तो 150 किमी पर्यंत जाण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वादळाचा वेग कमी होणार ?

कच्छला या वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मच्छीमारांना उत्तर – पू्र्व अरबी समुद्रापासून दूर राहण्याची सूचना देण्यात आली आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगरमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. 16 तारखेला या वादळाचा वेग घटून दर ताशी 85 किमी होण्याची शक्यता आहे. गुजरातच्या किनारी भागाला याचा तडाखा बसणार आहे. या वादळामुळे कच्ची घरे, बांधकामे, इलेक्ट्रीक आणि रेल्वेचे पोल तसेच झाडे कोसळण्याची शक्यता हवामानखात्याने वर्तविला आहे.