AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

E-Rupee वर मोठी अपडेट! रिजर्व बँक डिजिटल करन्सी आणण्याच्या तयारीत, कसे असेल स्वरूप?

डिजिटल करन्सी आणण्याबाबत रिजर्व बँक सकारात्मक असल्याचे संकेत देण्यात आलेले आहेत. याचा उपयोग कसा होणार जाणून घेऊया.

E-Rupee वर मोठी अपडेट! रिजर्व बँक डिजिटल करन्सी आणण्याच्या तयारीत, कसे असेल स्वरूप?
इ-रुपी Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 07, 2022 | 8:12 PM
Share

नवी दिल्ली,  आरबीआयचे (RBI) स्वतःचे डिजिटल चलन लवकरच प्रत्यक्षात आणण्याच्या तयारीत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ई-रुपी (E-Rupee) संदर्भात एक मोठे अपडेट (Update) दिले आहे. बँकेने एक संकल्पना जारी केली आहे. यामध्ये  रिझर्व बँक ई-रुपी प्रत्यक्षात आणण्याबाबत सांगण्यात आलेले आहे. डिजिटल चलनाचा योग्य वापर व्हावा यासाठी लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने ही संकल्पना  जारी करण्यात आली आहे.

काय आहे संकल्पना

शुक्रवारी आरबीआयने ई-रुपी लॉन्च करण्याबाबत तयार केलेली योजना सांगण्यात आली. बँकेने शेअर केलेल्या माहितीनुसार, ई-रुपी लाँच करण्याची योजना आखली जात आहे. पायलट प्रोजेक्टमध्ये, ते केवळ विशेष परिस्थितींसाठी वापरले जाऊ शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले की, ते लवकरच विशेष वापरासाठी प्रायोगिक तत्त्वावर ई-रुपी लाँच करणार आहे.

वेळोवेळी नवीन माहिती मिळेल

या संदर्भात माहिती देताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी सांगितले की, पथदर्शी प्रकल्पाची व्याप्ती जसजशी वाढत जाईल तसतशी आरबीआय ई-रुपीशी संबंधित वैशिष्ट्ये आणि फायदे सामायिक करत राहील. लोकांमध्ये सेंट्रल बँक डिजिटल करन्सीबद्दल (CBDC)  जागरूकता पसरवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक संकल्पना पत्र जारी केली आहे.

खिशात रोख ठेवण्याची गरज नाही

देशात आरबीआयचे डिजिटल चलन (ई-रुपी) सुरू झाल्यानंतर, तुम्हाला तुमच्याकडे रोख ठेवण्याची गरज भासणार नाही. तुम्ही ते तुमच्या मोबाईल वॉलेटमध्ये ठेवू शकाल आणि या डिजिटल चलनावर रिझर्व्ह बँकेचे पूर्ण नियंत्रण असेल. विशेष म्हणजे, या वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पादरम्यान, अर्थमंत्र्यांनी सांगितले होते की या आर्थिक वर्षात RBI ब्लॉकचेन तंत्रज्ञान CBDC वर आधारित डिजिटल चलन सादर करेल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.