AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका, टॅरिफचा डाव उलटला, भारतासह या 5 देशांनी घेतला सर्वात मोठा निर्णय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर आता ट्रम्प यांना मोठा धक्का बसला असून, भारतासह पाच देशांनी मोठा निर्णय घेतला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका, टॅरिफचा डाव उलटला, भारतासह या 5 देशांनी घेतला सर्वात मोठा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: बापू गायकवाड | Updated on: Aug 24, 2025 | 10:16 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून त्यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला आहे. आता 28 ऑगस्टपासून भारतीय वस्तुंवर अमेरिकेकडून 50 टक्के टॅरिफ लावण्यात येणार आहे. अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर आता भारत देखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. भारत सरकारने अमेरिकेला जाणारी टपाल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता अमेरिकेला आणखी एक मोठा दणका बसला आहे.

युरोपमधून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे भारतानंतर आता इटली, ब्रिटेन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड आणि ऑस्ट्रिया यांच्यासह अनेक देशांनी अमेरिकेला जाणारी टपाल सेवा रद्द केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचा निषेध करण्यासाठी या देशांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रम्प प्रशासनाकडून टॅरिफच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे, ज्यामध्ये 800 डॉलर ( भारतीय रुपयांमध्ये 70 हजार रुपये) पर्यंतच्या वस्तूंवर मिळणारी टॅरिफ सूट रद्द करण्याचा निर्णय 30 जुलै रोजी घेण्यात आला आहे, हा निर्णय आता 29 ऑगस्टपासून लागू होणार आहे. नव्या नियमांबाबत अमेरिकेनं अद्याप स्पष्ट माहिती दिली नसल्यानं अनेक युरोपीयन देशांनी अमेरिकेला जाणारी टपाल सेवा रद्द केली आहे.

भारतानं 25 ऑगस्ट रोजी बंद केली सेवा

भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेकडून टॅरीफ लागू करण्याबाबत आणि वसुलीची प्रक्रिया नेमकी कशी असणार? याबाबत कोणतीही स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे जोपर्यंत सर्व बाजू स्पष्ट होत नाहीत, तोपर्यंत भारतातून अमेरिकेला जाणारी टपाल सेवा स्थगित राहणार आहे. त्यानंतर आता भारतानंतर इटली, ब्रिटेन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड आणि ऑस्ट्रिया यांच्यासह अनेक देशांनी अमेरिकेला जाणारी टपाल सेवा रद्द केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाच्या विरोधात हा निर्णय घेण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केवळ भारतावरच नाही तर जगातील अनेक देशांवर टॅरिफ लावला आहे, ट्र्म्प यांच्या या धोरणावर अनेक देश नाराज आहेत.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा