ओवेसी फॅक्टरने समीकरणच बदलले, 11 जागांवर NDA ची घोडदौड

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजला झटका देण्यासाठी 20 जागांवर आपले उमेदवार उभे केले (Bihar Assembly election 2020).

ओवेसी फॅक्टरने समीकरणच बदलले, 11 जागांवर NDA ची घोडदौड
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 2:51 PM

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly election 2020) एमआयएम पक्षाने 20 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे मुस्लिम मतदार सर्वाधिक असणाऱ्या सीमांचल प्रांतात एमआयएमने आपले 14 उमेदवार उभे केले आहेत. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार एमआयएम फक्त तीन जागांवर आघाडीवर आहे. तर दोन जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजला झटका देण्यासाठी 20 जागांवर आपले उमेदवार उभे केले. मात्र, ओवेसी यांच्या या रणनितीने भाजप्रणित एनडीएला सर्वाधिक फायदा झाल्याचं समोर येत आहे. तर महागठबंधनला खूप मोठा फटका बसताना दिसत आहे (Bihar Assembly election 2020).

सीमांचल प्रांतात विधानसभेच्या एकूण 24 मतदारसंघापैकी 11 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर महागठबंधन फक्त पाच जागांवर आघाडीवर दिसत आहे. उर्वरित आठ जागांवर इतर आघाडीवर असल्याचं समजत आहे. यामध्ये एमआयएम तीन जागांवर आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

ओवेसी यांचा पक्ष अमौर आणि कौचाधामन मतदारसंघात आघाडीवर दिसत आहे. काही मतदारसंघांमध्ये एमआयएम भलेही पिछाडीवर असले तरी या पक्षामुळे महागठबंधनला मोठा फटका बसला आहे. परिणामी, त्याचा फायदा भाजपला जास्त झाल्याचं दिसत आहे.

सीमांचल प्रांतातील 24 जागांवर महागठबंधनकडून आरजेडी 11, काँग्रेस 11, भाकपा-माले 1 आणि सीपीएम 1 जागांवर निवडणूक लढवत आहेत. तर एनडीएकडून भाजप 12, जेडीयू 11 जागांवर लढत आहेत.

विशेष म्हणजे 2015 च्या विधानसभा निवडणुकीत सीमांचल प्रांतात काँग्रेसला सर्वाधिक जागांवर यश मिळालं होतं. काँग्रेसने या प्रांतात 9 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर जेडीयूने 6 तर आरजेडीने 3 जागांवर विजय मिळवला होता. भाजपने या प्रांतात 6 तर भाकपाला 1 जागेवर समाधान मानावं लागलं होतं.

एमआयएमने 2015 च्या विधानसभा निवडणुकीत सीमांचल प्रांतात 6 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यावेळी एमआयएमच्या हाती फारसं यश आलं नव्हतं. पण कोचाधामन मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार अख्तरुल इमान दुसऱ्या नंबरवर होते.

दरम्यान, 2019 साली किशनगंज येथे झालेल्या पोटनिवडणुकीत एमआयएमने जोर लावला होता. अखेर त्या पोटनिवडणुकीत आपलं खातं खोलण्यात एमआयएमला यश आलं होतं. सध्या सीमांचल प्रांतात भाजपचे उमेदवार आघाडीवर दिसत आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकार काँग्रेस तर तिसऱ्या क्रमांकावर एमआयएमचे उमेदार आघाडीवर दिसत आहेत.

संबंधित बातम्या :

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं!

मुख्यमंत्रिपदाच्या आशेने लंडनहून बिहारला, पुष्पम प्रिया दोन्ही मतदारसंघांत पिछाडीवर

भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं, कार्यालयाबाहेर मोदी जिंदाबादच्या घोषणा

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.