AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहारच्या राजकारणात नव्या पक्षाची उडी, लंडनमधून तरुणीचा मुख्यमंत्रिपदावर दावा

8 मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त पुष्पम प्रिया चौधरी यांनी जाहिरात देत बिहार मुख्यमंत्री पदासाठी उमेदवारी जाहिर केली

बिहारच्या राजकारणात नव्या पक्षाची उडी, लंडनमधून तरुणीचा मुख्यमंत्रिपदावर दावा
| Updated on: Mar 09, 2020 | 3:22 PM
Share

पाटणा : आगामी बिहार विधानसभा निवडणुकांसाठी (Bihar Politics) एकीकडे मुख्यमंत्री नितीश कुमार एनडीएचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. तर दुसरीकडे, आरजेडी नेता तेजस्वी यादव हे महागठबंधनकडून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, रविवारी सकाळी बिहारच्या जनतेला तिसऱ्या मुख्यमंत्री दावेदाराची ओळख झाली.

बिहारच्या अनेक मुख्य वर्तमानपत्रांमध्ये रविवारी एक (Bihar Politics) जाहिरात छापून आली. यामध्ये पुष्पम प्रिया चौधरी (Pushpam Priya Choudhary) नावाच्या एका महिलेने स्वत:ला 2020 विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाची दावेदार म्हणून स्व:घोषित केलं आहे.

हेही वाचा : युझरने पंतप्रधानांच्या ट्विटर हँडलचा पासवर्ड विचारला आणि…

वर्तमानपत्रात जाहिरात

या जाहिरातीच्या माध्यमातून या महिलेने सांगितलं, ‘प्लुरल्स’ (Plurals) नावाचं एक राजकीय पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाच्या त्या अध्यक्षा आहेत. 8 मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त पुष्पम प्रिया चौधरी यांनी जाहिरात देत उमेदवारी जाहीर केली. पुष्मप प्रिया चौधरी यांनी जाहिरातीत सांगितलं की, त्यांनी परदेशातून शिक्षण घेतलं आहे आणि आता त्या बिहारमध्ये परत येऊन बिहारचा कायापालट करु इच्छितात.

या जाहिरातीत पुष्मप प्रिया चौधरी यांनी एक पंच लाईनही दिली, “जन गण सबका शासन”. या जाहिरातीत हे सांगण्यात आलं की आता बिहारमध्ये कुणाचं सरकार येईल. बिहार विकासायोग्य आहे आणि इथे विकास होऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

लंडनमध्ये शिक्षण

पुष्पम प्रिया चौधरी या द्विपदवीधर (Double MA) आहेत. इंग्लंडच्या द इन्स्टीट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज विश्वविद्यालयातून त्यांनी एमए इन डेव्हलपमेंट स्टडीज आणि लंडन स्कूल ऑफ इकोनोमिक्स अॅण्ड पॉलीटिकल सायन्समधून पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये एमए केलं आहे.

हा पक्ष सकारात्मक राजकारण आणि योजना बनवण्याच्या विचारधारेवर केंद्रित आहे. पुष्पम प्रिया चौधरी यांनी जाहिरातीत बिहारच्या जनतेसाठी एक पत्रही लिहिलं आहे. यामध्ये त्या म्हणाल्या, जर त्या बिहारच्या मुख्यमंत्री होतात तर 2025 पर्यंत बिहारला त्या देशातील सर्वात विकसित राज्य बनवेल आणि 2030 पर्यंत बिहार युरोपियन देशांसारखं असेल. त्यांनी निवडणुकांमध्ये बिहारच्या जनतेचा पाठिंबा मागितला आहे.

पुष्पम प्रिया चौधरी या दरभंगा येथील राहणाऱ्या आहेत. त्या (Bihar Politics) जेडीयूच्या माजी विधान परिषद सदस्य विनोद चौधरी यांची मुलगी आहे. त्या सध्या लंडन येथे राहातात.

संबंधित बातम्या :

‘मी परमेश्वराला नाही मात्र मोदींना बघितलंय’, महिलेच्या प्रतिक्रियेनंतर पंतप्रधान मोदी भावूक

आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्व नाही, राम मंदिरासाठी 1 कोटी, अयोध्येत उद्धव ठाकरेंची घोषणा

हा पक्षाचा नाही, तर आस्थेचा विषय, काँग्रेस नेते आणि मंत्री सुनील केदार अयोध्येत

ग्राऊंड रिपोर्ट – अयोध्या : ‘बालासाहब का बेटा आ रहा हैं’

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.