AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य प्रदेशात ‘ऑपरेशन लोटस’, 25 कोटी देऊन आठ आमदार फोडले, सत्ताधारी काँग्रेसचा आरोप

मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार उलथवण्यासाठी भाजपने सत्ताधाऱ्यांच्या आठ आमदारांना हॉटेलमध्ये कोंडलं आहे. त्यांना 25 ते 35 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. Congress MLAs hostage in Gurugram

मध्य प्रदेशात 'ऑपरेशन लोटस', 25 कोटी देऊन आठ आमदार फोडले, सत्ताधारी काँग्रेसचा आरोप
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Mar 04, 2020 | 8:40 AM
Share

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केल्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. भाजपने सत्ताधाऱ्यांच्या आठ आमदारांना हॉटेलमध्ये कोंडल्याचा दावा केला जात असून त्यांना 25 ते 35 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचाही आरोप काँग्रेसने केला आहे. (Congress MLAs hostage in Gurugram)

काँग्रेसचे चार, तर मित्रपक्षांचे चार, अशा आठ आमदारांना गुरुग्राममधील एका मोठ्या हॉटेलमध्ये बळजबरीने डांबून ठेवले आहे. मध्य प्रदेशात काल रात्री उशिरा या घडामोडी घडल्याचा दावा सत्ताधारी काँग्रेसने केला आहे. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

“आमचे आमदार आणि माजी मंत्री बिसाऊलाल सिंह यांनी आम्हाला फोन केला. गुरुग्राममधील हॉटेलमध्ये आपल्याला जबरदस्ती ठेवण्यात आलं असून बाहेर पडू दिलं जात नसल्याचं त्यांनी सांगितलं” असा दावा मध्य प्रदेशचे अर्थमंत्री तरुण भानोट यांनी केला.

आठ आमदारांना भेटण्यासाठी त्या हॉटेलमध्ये मध्य प्रदेशचे नगरविकास मंत्री जयवर्धन सिंह आणि उच्च शिक्षण मंत्री जितू पटवारी गेले होते, मात्र दोन्ही मंत्र्यांनाही हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला, असा आरोपही भानोट यांनी केला.

हेही वाचा : मध्य प्रदेश सरकारचं अधिकाऱ्यांना फर्मान, किमान एक नसबंदी करा, अन्यथा नोकरीवर गदा!

“हरियाणामध्ये भाजपचे सरकार असल्याने माजी मंत्री नरोत्तम मिश्रा (संपूर्ण कारवाईमागील सूत्रधार) यांच्या सहाय्याने राज्य पोलिस आमच्या दोन सहकाऱ्यांना आमदारांना भेटू देत नाहीत” असंही भानोट म्हणाले.

कमलनाथ सरकार पाडण्यासाठी काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या आमदारांना मोठ्या रोख रकमेच्या ऑफर देऊन घोडेबाजार होत आहे. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि माजी मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह भाजप नेते ‘ऑपरेशन लोटस’मध्ये गुंतल्याचा दावा आदल्याच दिवशी दिग्विजय सिंह यांनी केला होता.

228 सदस्यसंख्या असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे 114 आमदार आहेत. त्यांना दोन बसपा, एक सपा आणि चार अपक्षांसह 7 आमदारांचा पाठिंबा आहे. तर भाजपकडे 107 आमदारांचं बळ आहे. त्यामुळे आठ आमदारांना वळवल्यास भाजपला सत्ता खेचून आणणं शक्य होईल. (Congress MLAs hostage in Gurugram)

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ