AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election 2025 Exit Poll : बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष कोणता? भाजप, जेडीयू की आरजेडी? एक्झिट पोलचा हादरवणारा अंदाज

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलेले आहे. आता बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार, हे सांगणारे एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. हे आकडे धक्कादायक आहेत असे म्हणावे लागेल.

Bihar Election 2025 Exit Poll : बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष कोणता? भाजप, जेडीयू की आरजेडी? एक्झिट पोलचा हादरवणारा अंदाज
bihar vidhan sabha election exit poll
| Updated on: Nov 11, 2025 | 7:22 PM
Share

Bihar Election Exit Polls : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलेले आहे. मतदानाच प्रक्रिया संपल्यानंतर आता येथे कोणाचे सरकार येणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी बिहारमधील स्थानिक तसेच काँग्रेस आणि भाजपा यासारख्या राष्ट्रीय पक्षांनी पूर्ण ताकदीने प्रयत्न केला होता. आत मतदान संपले असून एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वेगवेगळ्या संस्थांनी एक्झिट पोलचे आकडे दिलेले आहेत. असे असतानाच आता काही ठिकाणी आरजेडी हा पक्ष सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरू शकतो, असे म्हटले जात आहे.

एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

बिहारची निवडणूक संपल्यानंतर आता वेगवेगळ्या संस्थांनी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यातील चाणक्य संस्थेच्या एक्झिट पोलनुसार लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव यांचा आरजेडी हा पक्ष सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरू शकतो. या प क्षाला 75 ते 80 जागा मिळू शकतात. त्यानंतर भाजपा हा पक्ष दुसऱ्या क्रमांवर येऊ शकतो. या पक्षाला एकूण 70 ते 75 जागा मिळू शकतात असा अंदाज चाणक्य संस्थेच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय.

मॅट्रिझ आएएनएस संस्थेच्या एक्झिट पोलमध्ये काय आहे?

मॅट्रिझ आएएनएस संस्थेच्या एक्झिट पोलनुसार बिहारचे विद्यामान मुख्यमंत्री नितीश कुमार याचा जेडीयू हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. या पक्षाला एकूण 67 ते 75 जागा मिळू शकतात. त्यानंतर भाजपा हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता मॅट्रिझ आयएएनएसने व्यक्त केली आहे. भाजपाला 65 ते 73 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर आरजेडी पक्षाला एकूण 53 ते 58 जागा मिळण्याची शक्यता चाणक्य मॅट्रिझ आयएएनएसच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलीय.

नितीश कुमार यांचा पक्ष ठरणार सर्वात मोठा?

पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार जेडीयू सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरू शकतो. या पक्षाला 67 ते 75 जागा मिळू शकतात. त्यानंतर भाजपा हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरू शकतो. या पक्षाला 65 ते 73 जागा मिळू शकतात. राजदला 53 ते 58 जागा मिळण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.