AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना सोडल्याप्रकरणी गुजरात सरकारला नोटीस; केंद्र सरकारलाही सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणावर दोन आठवड्यांनी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना सोडल्याप्रकरणी गुजरात सरकारला नोटीस; केंद्र सरकारलाही सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
| Updated on: Aug 25, 2022 | 1:32 PM
Share

मुंबईः बिल्किस बानो (Bilkis Bano) प्रकरणातील दोषींच्या सुटकेविरोधात (Petition against acquittal of convicts) दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाकडून गुजरात सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणावर दोन आठवड्यांनी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वास्तविक, गुजरात सरकारने (Government of Gujarat and Central Government)  बिल्किस बानो प्रकरणातील सर्व 11 दोषींना घटनात्मक अधिकारांतर्गत मुक्त केले होते. त्यामुळे गुजरात सरकारच्या या निर्णयावरही जोरदार टीका करण्यात आली आहे. या निर्णयावर विरोधकांनी तसेच भाजपच्या सर्व नेत्यांनीही अनेक सवाल उपस्थित केले आहेत. गुजरात सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून सामाजिक कार्यकर्त्या सुभाषिनी अली यांच्यासह चौघांनी गुजरात सरकारचा हा निर्णयही रद्द करण्याची मागणी केली आहे.

यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यत आले आहे की, गुजरातच्या नियमानुसार दोषींना सूट मिळण्याचा अधिकार आहे की नाही? सूट देताना ही बाब लक्षात घेतली गेली की नाही याचा गांभीर्याने विचार करायला हवा असंही सांगण्यात आले आहे.

समितीच्या अहवालानुसार गुजरात सरकारचा निर्णय

2002 मध्ये गुजरातमधील गोध्रा येथे झालेल्या दंगलीनंतर बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील 7 जणांचीही हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 2008 मध्ये 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामधील एका दोषीने सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाकडून सुटकेचा निर्णय गुजरात सरकारवर सोडून देण्यात आला होता. गुजरात सरकारकडून सुटकेबाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती त्या या समितीच्या अहवालावरूनच सर्व दोषींची सुटका करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

बिल्किस बानोने मुलीसह गाव सोडले

27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातमधील गोध्रा स्थानकावर साबरमती एक्स्प्रेसचा डबा जाळण्यात आला होता. या ट्रेनने कारसेवक अयोध्येहून परतत होते, त्यावेळी डब्यात बसलेल्या 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर गुजरातमध्ये दंगली उसळल्या होत्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित हानी होऊन प्रचंड नुकसा झाले होते. दंगलीपासून वाचण्यासाठी बिल्किस बानोने आपल्या मुलीसह कुटुंबासह गाव सोडले होते.

गरोदर बिल्किसवर बलात्कार

बिल्किस बानो आणि त्यांचे लपलेल्या कुटुंबीयांवर त्या ठिकाणी जाऊन तलवारी आणि काठ्यांनी हल्ला करण्यात आला होता. त्याचवेळी जमावाकडून बिल्किस बानोवर बलात्कार करण्यात आला. ज्या वेळी बिल्किस बानोवर बलात्कार करण्यात आला, त्यावेळी ती 5 महिन्यांची गरोदर होती. एवढेच नाही तर त्यांच्या कुटुंबातील 7 जणांची हत्याही करण्यात आली होती, तर राहिलेले 6 सदस्यांनी घाबरून तिथून पळ काढला होता.

हे आहेत 11 दोषी

ही घटना घडून गेल्यानंतर सीबीआय न्यायालयाने 11 जणांना दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र नुकताच गुजरात सरकारच्या निर्णयानंतर सर्व 11 दोषींची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी सुटका करण्यात आलेल्या दोषींमध्ये जसवंतभाई नई, गोविंदभाई नई, शैलेश भट्ट, राधेश्याम शाह, बिपिन चंद्र जोशी, केसरभाई वोहनिया, प्रदीप मोरधिया, बकाभाई वोहनिया, राजूभाई सोनी, मितेश भट्ट आणि रमेश चंदना यांचा समावेश आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.