AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संसदेत काही मोठी घोषणा होणार? भाजपने खासदारांना जारी केला व्हिप

BJP whip to MPs : भाजपने आपल्या खासदारांना उद्या संसदेत हजर राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे. लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातील खासदारांना हा व्हिप जारी करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या काही संसदेत मोठी घोषणा होणार का याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

संसदेत काही मोठी घोषणा होणार? भाजपने खासदारांना जारी केला व्हिप
shailesh musale
shailesh musale | Updated on: Feb 09, 2024 | 5:04 PM
Share

Bjp Whip : देशात लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. मंत्रिमंडळातील मंत्री देखील विरोधी पक्षांना लक्ष्य करण्याची संधी सोडत नाहीयेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यामुळेच विरोधकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी मोदी आणि त्यांचे सहकारी सोडत नाहीयेत. आज भाजपने आपल्या सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना व्हीप जारी केला आहे. अशा स्थितीत सरकार संसदेत काही मोठा मुद्दा उपस्थित करू शकते, असे मानले जात आहे.

10 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहण्याच्या सूचना

भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील मुख्य नेते लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी पक्षाच्या खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. सरकारच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी १० फेब्रुवारी रोजी राज्यसभेत उपस्थित राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. दुसरीकडे लोकसभा खासदारांनाही असाच व्हिप जारी करण्यात आला आहे. याआधी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी असे प्रस्तावित होते. मात्र, आता ती एक दिवसाने वाढवून १० फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे.

संसदेत श्वेतपत्रिका सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत श्वेतपत्रिका सादर केली. ज्यामध्ये 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात झालेल्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर माहिती देण्यात आली. या शिवाय भारताचे आर्थिक संकट आणि त्याचे अर्थव्यवस्थेवर होणारे नकारात्मक परिणाम याविषयी तपशीलवार माहिती देण्यात आलीये. मोदी सरकार कशा प्रकारे त्यावर सकारात्मक पाऊले उचलत आहेत त्याबाबत ही यामध्ये माहिती देण्यात आली आहे. कोल गेट घोटाळा, कॉमन वेल्थ गेम्स (CWG) घोटाळा इत्यादींचाही या श्वेतपत्रिकेत उल्लेख करण्यात आलाय,  ज्यामुळे सरकारी तिजोरीचे 1.86 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं देखील म्हटले आहे.

मोदी सरकार मोठे निर्णय

केंद्रातील मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले होते, ज्यामध्ये संसदीय आणि विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती वंदन कायदा मंजूर करण्यात आला होता. पाच राज्यांच्या निवडणूक निकालात सरकारच्या या पावलाचा फायदा भाजपला झाल्याचे मानले जात आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच