AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणुकीआधी मोठा राजकीय भूकंप, आणखी एक जुना मित्र भाजपसोबत येणार

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपने आपल्या जुन्या मित्रांना एकत्र आणण्यासाठी कंबर कसली आहे. अब की बार ४०० पार असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यामुळे आता भाजप एनडीएमध्ये जुन्या मित्रांना पुन्हा एकत्र करु लागला आहे.

लोकसभा निवडणुकीआधी मोठा राजकीय भूकंप, आणखी एक जुना मित्र भाजपसोबत येणार
modi shah
shailesh musale
shailesh musale | Edited By: | Updated on: Feb 12, 2024 | 7:04 PM
Share

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना आधी इंडिया अलायन्सला एकामागे एक मोठे झटके लागत आहे. आधी ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर आम आदमी पक्षाने देखील आपण स्वबळावर पंजाबमध्ये निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. मग बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे भाजप आपल्या जुन्या मित्रांना परत एनडीए आघाडीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यासाठी भाजपने एक कमिटी देखील स्थापन केली आहे. महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना एनडीएमध्ये सहभागी करुन घेतल्यानंतर आता भाजप मनसेला देखील एनडीएमध्ये आणण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जात आहे.

४ राज्यांमध्ये ४ जुने मित्र

दुसरीकडे आंध्रप्रदेशात भाजपने टीडीपी सोबत बोलणी सुरु केल्याची चर्चा आहे. आंध्रप्रदेशात भाजपला स्वबळावर जागा जिंकणे कठीण आहे. त्यामुळे ते टीडीपी सोबत युती करु शकतात. यूपीमध्ये देखील भाजपने आरएलडीला आपल्यासोबत घेण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाला मोठा झटका लागू शकतो. आता पंजाबच्या राजकारणात देखील भाजपकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. कारण भाजपने पुन्हा एकदा अकाली दल पक्षाला आपल्यासोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दल यांनी आधी पासून युती होती. पण नंतर ती तुटली. पण आता अकाली दल पुन्हा एकदा एनडीएमध्ये परतण्याची शक्यता आहे. अकाली दल आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. देशात एप्रिल-मे महिन्यांदरम्यान लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.

भाजपचे ४०० जागा जिंकण्याचं टार्गेट

भाजपला लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा जिंकायच्या आहेत. भाजपला ३७० तर एनडीएला ४०० हून अधिक जागा मिळतील असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. त्यामुळे आता भाजप कामाला लागली आहे. पंजाबमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी ते अकाली दलसोबत युती करु शकतात. लवकरच त्याची अधिकृत घोषणा होणार आहे.

अकाली दल एनडीएपासून का वेगळा झाला?

पंजाबमधील शिरोमणी अकाली दल हा 1997 ते सप्टेंबर 2020 पर्यंत भाजपचा जुना मित्र आहे. मात्र, 2020 मध्ये हरसिमरत कौर बादल यांनी तीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. काही दिवसांनी दोन्ही पक्ष वेगळे झाले. नंतर शेतीविषयक कायदे मागे घेण्यात आले. पंजाब विधानसभेची निवडणूकही दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली होती.

Follow Us
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर, चाकणकरांच्या नोटीसला थेट चॅलेन्ज
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
Video | पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने समर्थक आक्रमक
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हासह दिग्गज चेहऱ्यांनी सोडली TMCची साथ?
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदे यांचा मोठा आदेश, आता...
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस, फोटो अन् कविता तुफान चर्चेत
सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
Parbhani | सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! परभणीत वादळी पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं प्रकरण काय?
महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर ठोंबरेंचा घणाघात
Rupali Chakankar | महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर रुपाली ठोंबरेंचा घणाघात!