AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मत दिलं, आता लग्न लावून देणार! भाजप आमदार शोधणार तरुणांसाठी बायको, केली मोठी घोषणा

Marriage Promise : भाजप आमदार बिमला चौधरी यांनी निवडणुकीत दिलेलं लग्न लावून देण्याचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी अविवाहित तरुणांना बायोडाटा घेऊन भेटण्याचं आवाहन केलं आहे.

मत दिलं, आता लग्न लावून देणार! भाजप आमदार शोधणार तरुणांसाठी बायको, केली मोठी घोषणा
Marriage Image Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 16, 2026 | 6:42 PM
Share

निवडणुकीच्या काळात उमेदवार वीज, पाणी, रस्ते आणि रोजगार याबाबत आश्वासने देत असतात. मात्र आता हरियाणातील एक भाजप महिला आमदार निवडणुकीदरम्यान दिलेल्या एका वेगळ्याच आश्वासनामुळे चर्चेत आली आहे. आमदार बिमला चौधरी यांनी निवडणुकीच्या काळात तरुणांचे लग्न लावण्याची जबाबदारी घेण्याचे जाहीर केले होते. आता भाजपने रेवाडी नगर परिषद निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी अविवाहित तरुणांना आपला बायोडाटा घेऊन भेटण्याचे आवाहन केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भर सभेत लग्न लावून देण्याची घोषणा

रेवाडी नगर परिषद निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार विनिता पीपल यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर आयोजित आभार सभेत आमदार बिमला चौधरी यांच्यासोबत हरियाणाच्या आरोग्यमंत्री आरती राव देखील उपस्थित होत्या. यावेळी बोलताना बिमला चौधरी यांनी म्हटले की, ‘निवडणूक प्रचारात मी जे वचन दिलं होतं, त्यावर आजही ठाम आहे. तुमच्या ओळखीतील एखादा मुलगा अविवाहित असेल, तर त्याचा बायोडाटा माझ्याकडे आणा. आम्ही आधीही अनेक मुलींची लग्नं लावून दिली आहेत. आता उरलेल्या अविवाहित मुलांचं घर बसवण्याची जबाबदारीही माझीच आहे.’

प्रचारसभेतच उघडलं होतं ‘मॅरेज ब्युरो’

आमदार बिमला चौधरी यांच्या या आश्वासनाची सुरुवात रेवाडी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत झाली होती. एका जाहीर सभेत बिमला चौधरी यांनी महिलांना आणि युवकांना संबोधित करताना म्हटले होते, ‘तुम्ही विनीता पीपल यांना मोठ्या मतांनी विजयी करा. शहर विकासाची जबाबदारी आमची आहेच, पण ज्या युवकांची लग्नं होत नाहीत, त्यांचं लग्न लावून देण्याची हमीही मी देते.’ चौधरी यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण सभेत हशा पिकला होता.

बिमला चौधरी यांचा राजकीय प्रवास

बिमला चौधरी या हरियाणा भाजपातील चर्चित चेहरा मानल्या जातात. त्या पटौदी (SC राखीव) मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार बनल्या आहेत. 2014 मध्ये पहिल्यांदा निवडून येताना त्यांनी स्वतःला निरक्षर असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. मात्र, 2018 मध्ये त्यांनी NIOS मधून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर 2024 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार पर्ल चौधरी यांचा पराभव केला होता.

Follow Us
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?