Budget 2021 : अर्थसंकल्पाचे फायदे सांगण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन!

2021च्या अर्थसंकल्पाचे फायदे लोकांना समजावून सांगण्यासाठी भाजपनं एक प्लॅन आखला आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राज्यातील पक्षाचे प्रमुख आणि सर्व लोकप्रतिनिधींना अर्थसंकल्पाच्या समर्थनात कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Budget 2021 : अर्थसंकल्पाचे फायदे सांगण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन!
जे.पी. नड्डा भाजप अध्यक्ष

मुंबई : 1 फेब्रुवारीला संसदेत सादर झालेल्या 2021च्या अर्थसंकल्पाचे फायदे लोकांना समजावून सांगण्यासाठी भाजपनं एक प्लॅन आखला आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राज्यातील पक्षाचे प्रमुख आणि सर्व लोकप्रतिनिधींना अर्थसंकल्पाच्या समर्थनात कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना 6 आणि 7 फेब्रुवारीला सर्व राज्यांच्या राजधानीमध्ये पत्रकार परिषद घेण्यास सांगण्यात आलं आहे.(BJP President J. P. Nadda’s plan to explain the benefits of Budget 2021)

दरम्यान, अर्थसंकल्पाबाबत पत्रकार परिषद घेण्यापूर्वी वाणिज्य आणि संबंधित संस्थांसोबत बैठक किंवा चर्चासत्राचं आयोजन करण्यास सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पाबाबत एक PPT प्रझेंटेशन देऊन सविस्तर माहिती देण्याची सूचनाही करण्यात आली आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पाबाबत माहितीपुस्तिकाही वितरीत केल्या जाव्यात असं सांगण्यात आलं आहे.

भाजपचे मंत्री, लोकप्रतिनिधी अर्थसंकल्पाची महती सांगणार

6, 7, 13 आणि 14 फेब्रुवारीला सर्व खासदार आपल्या मतदारसंघात अर्थसंकल्पाचा प्रचार करतील. 13 आणि 14 फेब्रुवारीला अर्थसंकल्पाबाबत स्थानिक सामाजिक बुद्धिजीवी वर्ग आणि आर्थिकबाबींशी निगडीत संस्थासोबत संम्मेलनाचं आयोजन केलं जावं. त्यात खासदार आणि लोकप्रतिनिधींनी सहभाग घ्यावा, अशी सूचनाही जे. पी. नड्डा यांच्याकडून करण्यात आली आहे.

भाजपकडून समर्थन, विरोधकांची टीका

भाजपशासित राज्यांमध्ये 2021च्या अर्थसंकल्पाचा प्रचार करण्याच्या सूचना भाजप श्रेष्ठींनी दिल्या आहेत. लोकांना या अर्थसंकल्पाचं महत्व आणि फायदे समजावून सांगण्यात यावेत, अशा सूचनाही दिल्या आहेत. हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणारा, जलसिंचन वाढवणारा, रोजगार, आणि गरीबांसाठी समर्पित असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. पण विरोधकांकडून मात्र या अर्थसंकल्पावर जोरदार टीका होत आहे.

ज्या राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्या राज्यांना नजरेसमोर धरुन हा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचा आरोप विरोधक करत आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधावा लागत असल्याची खोचक टिप्पणी विरोधक करत आहेत.

संबंधित बातम्या :

Budget 2021-22 : तुमच्याकडेही 20 वर्षांपेक्षा जुनी गाडी आहे? Scrappage Policy चा परिणाम काय?

Union Budget 2021 highlights : टॅक्स स्लॅब ते उद्योग व्यापार, काय महाग, काय स्वस्त, अर्थसंकल्प जसाच्या तसा!

Budget 2021: बजेट देशासाठी हवं, निवडणुकांसाठी नको; मुख्यमंत्र्यांचा टोला

BJP President J. P. Nadda’s plan to explain the benefits of Budget 2021

Published On - 4:10 pm, Thu, 4 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI