Elections 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजप सर्व 117 जागा लढवणार

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान शर्मा म्हणाले, "राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सर्व जागांवर निवडणूक लढवेल". गेल्या आठवड्यात, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Capt Amarinder Singh) यांनी संकेत दिले होते केले की त्यांचा नवीन राजकीय पक्ष भाजपसोबत जागावाटप करेल.

Elections 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजप सर्व 117 जागा लढवणार
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 2:57 PM

भारतीय जनता पक्ष (भाजप) पंजाबचे अध्यक्ष अश्वानी शर्मा यांनी रविवारी घाषीत केले की 2022 च्या विधानसभा निवडणुकीत पंजाबमधील सर्व 117 मतदारसंघ भाजप लढवेल. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान शर्मा म्हणाले, “राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सर्व जागांवर निवडणूक लढवेल”. (BJP to fight on all 117 seats in Punjab state elections likely seat sharing with Capt Amarinder Singh)

गेल्या आठवड्यात, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी संकेत दिले होते केले की त्यांचा नवीन राजकीय पक्ष भाजपसोबत जागावाटप करेल, जर कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांच्या हितासाठी काही तोडगा काढला जाईल.

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या राजकीय वादानंतर अमरिंदर सिंग यांनी सप्टेंबरमध्ये पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. पंजाबमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत, काँग्रेसने 77 जागा जिंकून राज्यात पूर्ण बहुमत मिळवले होते आणि 10 वर्षांनंतर शिरोमणी अकाली दल-भाजपचं सरकार पाडलं होतं. आम आदमी पक्ष 20 जागा जिंकून दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शिरोमणी अकाली दल केवळ 15 जागा आणि भाजप 3 जागा जिंकू शकले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही हजेरी लावली. या बैठकीत आगामी सात राज्यांच्या निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली.

Related News

BJP: भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणुका, आर्टिकल 370 सह ‘या’ मुद्द्यांवर चर्चा

पंजाब सरकारची मोठी घोषणा; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात, सर्वसामान्यांना दिलासा

पंतप्रधानांच्या प्रयत्नामुळे भारत मजबूत स्थितीमध्ये; जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली दखल, नड्डांनी केले मोदींचे कौतुक

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.