युकेमध्ये अभ्यासासाठी गेलेल्या भाजप नेत्याचा मुलगा बेपत्ता

युनाइटेड किंगड्म अभ्यासासाठी गेलेल्या भाजपच्या एका नेत्याचा मुलगा बेपत्ता झाला आहे. उज्ज्वल श्रीहर्षा (23) (Ujwal Sriharsha) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे.

युकेमध्ये अभ्यासासाठी गेलेल्या भाजप नेत्याचा मुलगा बेपत्ता
Follow us
| Updated on: Aug 27, 2019 | 8:47 AM

हैद्राबाद : युनाइटेड किंगड्म अभ्यासासाठी गेलेल्या भाजपच्या एका नेत्याचा मुलगा बेपत्ता झाला आहे. उज्ज्वल श्रीहर्षा (23) (Ujwal Sriharsha) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. उज्ज्वल हा भाजप नेते उदय प्रताप यांचा मुलगा आहे. उदय प्रताप (Uday Pratap) हे तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहे.

उज्ज्वल हा गेल्यावर्षी युकेमध्ये मशीन लर्निंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजेंस यात MS करण्यासाठी गेला होता. त्याने 21 ऑगस्टला आपल्या आईला शेवटचा फोन केला. उज्ज्वल हा घरी नियमित फोन करायचा. मात्र 22 ऑगस्टला मुलाचा फोन न आल्याने त्याच्या वडीलांनी त्याला फोन केला. मात्र उज्ज्वलने त्यांचा फोन उचलला नाही.

यानंतर शुक्रवारी 23 ऑगस्ट लंडन पोलिसांनी उज्ज्वल बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या वडीलांना दिली. त्यावेळी लंडन पोलिसांनी उज्ज्वलची बॅग लंडनच्या एका समुद्रकिनाऱ्यावर आढळली असल्याचेही सांगितले.

त्याच्या वडीलांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वल हा अभ्यासात फार हुशार होता. त्याचे प्राथमिक शिक्षण आंध्रप्रदेशातील मदनपल्ले या ठिकाणच्या ऋषीवैल्ली शाळेतून झाले आहे. त्यानंतर त्याने हैद्राबादमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.

उज्ज्वल याला वैज्ञानिक होण्याची इच्छा होती. नुकतंच तो एका प्रोजेक्टसाठी जपानमध्ये गेला होता. दरम्यान केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी या प्रकरणात संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.