Delhi Balst : दिल्लीच्या महिपालपूरमध्ये स्फोटाचा आवाज ऐकताच महिलेचा पोलिसांना फोन
Delhi Balst : सोमवारी संध्याकाळी दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ i20 कारमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीची जनता दहशतीमध्ये आहे.

राजधानी दिल्लीच्या महिपालपूर भागात गुरुवारी स्फोटासारखा आवाज ऐकू आला. दिल्ली पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. सकाळी 9 वाजून 18 मिनिटांनी एका महिलेने फायर ब्रिगेडला फोन केलेला. त्यानंतर घटनास्थळी दिल्ली पोलिसांची टीम पोहोचली. दिल्ली पोलिसांना काही संशयास्पद आढळलं नाही. पोलिसांनी सांगितलं की, ‘DTC बसाच टायर फुटला. ड्रायव्हर घटनास्थळी आहे. पॅनिकची स्थिती नाहीय. टायर फुटणं ही सामान्य घटना आहे’ सोमवारी संध्याकाळी दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ i20 कारमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीची जनता दहशतीमध्ये आहे. महिपालपूर भाग दिल्ली-गुरुग्राम बॉर्डर जवळ आहे. IGI एअरपोर्टपासून हा भाग खूप जवळ आहे.
दिल्लीत झालेला कार बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याच काल केंद्र सरकारने मान्य केलं. काल दिल्लीत कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक पार पडली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल उपस्थित होते. मंत्रिमंडळ समितीच्या या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात स्वतंत्र बैठक झाली. ही बैठक सुमारे अर्धातास चालली. या बैठकीत देशाच्या सुरक्षेबाबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
उमरचा डीएनए जुळला
i20 कारमध्ये स्फोट घडवणारी व्यक्ती दहशतवादी डॉक्टर उमर नबी ऊर्फ उमर मोहम्मद असल्याचं स्पष्ट झालय. उमरच्या मृतदेहाचा डीएनए त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी 100 टक्के जुळला आहे. सर्वप्रथम सीसीटीव्हीमध्ये उमरचा चेहरा दिसला होता. त्याने तोंडाला मास्क लावलेला होता. उमरने स्फोट घडवण्याच्या 11 दिवस आधी ही कार खरेदी केली होती. उमर हा फरिदाबादच्या व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा एक प्रमुख सदस्य होता आणि तो फरार होता. पोलिसांनी जम्मू कश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेश पर्यंत पसरलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करत जवळपास 3,000 किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट, पोटेशियम क्लोरेट आणि सल्फर जप्त केलं आहे.
