आंदोलनात लहान मुलांच्या सहभागावर बंदी घाला, शौर्य पुरस्कार विजेत्या झेन सदावर्तेची याचिका

लहान मुलांना आंदोलनात सहभागी करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका झेन सदावर्तेने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

आंदोलनात लहान मुलांच्या सहभागावर बंदी घाला, शौर्य पुरस्कार विजेत्या झेन सदावर्तेची याचिका
Follow us
| Updated on: Feb 05, 2020 | 1:10 PM

नवी दिल्ली : आंदोलनामध्ये लहान मुलांना आणण्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही याचिका करणारी बारा वर्षीय बालिका राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेती झेन सदावर्ते (Zen Sadavarte Petition in Supreme Court) आहे.

दक्षिण दिल्लीतील शाहीन बागमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान चार महिन्यांच्या मोहम्मद जहांचा मृत्यू झाला होता. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) याविरोधातील आंदोलनात पालकांसोबत सहभागी झालेल्या मोहम्मदला प्राण गमवावे लागले होते.

मोहम्मदच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर, लहान मुलांना आंदोलनात सहभागी करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका झेनने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. मोहम्मदच्या मृत्यूचं नेमकं कारण डेथ सर्टिफिकेटमध्ये नमूद नाही, त्यामुळे पोलिस आणि संबंधित प्रशासनांना या प्रकरणी तपास करण्याचे आदेश देण्याची विनंतीही झेनने केली आहे.

मुंबईकर झेन सदावर्ते हिला प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तिने मुंबईतील रहिवाशी इमारतीला लागलेल्या आगीत अडकलेल्या 17 जणांना बाहेर काढलं होतं.

कोण आहे झेन सदावर्ते? 

झेन सदावर्ते ही मुंबई उच्च न्यायलयातील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी आहे. 22 ऑगस्ट 2018 रोजी मुंबईच्या हिंदमाता परिसरातील क्रिस्टल टॉवर या इमारतीत आग लागली होती. त्यात चौघांचा मृत्यू झाला होता. तर 18 जण जखमी झाले. झेनच्या प्रसंगावधानामुळे तब्बल 17 जणांचा जीव वाचला होता.

गुणरत्न सदावर्ते हे क्रिस्टल टॉवरच्या 16 व्या मजल्यावर राहत होते. अचानक लागलेल्या आगीच्या प्रसंगी लहानग्या झेनने आपल्या आईवडिलांना शांत केले. त्यानंतर प्रसंगावधान राखत घरातील सुती कपडे ओले केले आणि ते नाकाशी धरुन शांतपणे श्वास घेण्यास सांगितले.

झेन डॉन बॉस्को इंटरनॅशनल शाळेत शिकते. शाळेत आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे दिले जातात, याचाच तिने योग्य पद्धतीने वापर केला होता. आईवडिलांसह जवळपास 15 जणांना तिने बाल्कनीत बसवले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने हे सर्व बाहेर आले.

Zen Sadavarte Petition in Supreme Court

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.