डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना साक्ष मानले, संविधानाची घेतली शपथ, विवाह बंधनात अडकले वधू – वर, कुठे झाला अनोखा विवाह
या अनोख्या विवाहात वधू आणि वराने डॉ. बाबासाहेबांना साक्षी मानले आणि भारतीय घटनेची शपथ घेतल्यानंतर वधू आणि वरांनी एकमेकांना हार घातला. या विवाह सोहळ्याला हजर असलेल्या लोकांनी या जोडप्याचे अभिनंदन केले.

विवाह म्हटले की धार्मिक रितीरिवाज आले, परंतू आंध्रप्रदेशातील खम्मम जिल्ह्यात एक अनोखा विवाह झाला आहे. या विवाहात कोणतेही मंत्र पढण्यासाठी पंडीतजी आले नाहीत की इतर रितीरिवाज झाले नाहीत. एका स्टेजवर वधू आणि वरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसबिरीसमोर वधू आणि वरांनी एकमेकांना पुष्पहार घातले आणि संविधानाची शपथ घेतली आणि विवाह संपन्न झाला. या विवाहाला डॉ.आंबेडकर यांच्या आदर्शांना मानणारे लोक आशीवार्द देण्यासाठी उपस्थित होते.
या अनोख्या विवाहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आंध्र प्रदेशातील पोलीस खात्यात तैनात असलेले बीरवल्ली प्रशांत यांचा विवाह महिला कॉन्स्टेबल नागा ज्योति हिच्याशी झाला. बीरवल्ली प्रशांत हा तरुण आंध्रप्रदेशच्या खम्मम जिल्ह्यातील पेनुबल्ली मंडलच्या टेकुलापल्ली गावचा आहे. या वधू – वराने आपल्या विवाहात कोणताही खर्च न करता किंवा धार्मिक अवडंबर न माजवता साधे पणाने विवाह करण्याचा निर्णय घेतला. परंपरागत लग्न करता हटके विवाह करण्याचे त्यांनी ठरविले होते.
वधू आणि वर दोघांनी हा विवाह वेद आणि मंत्रांच्या उच्चारात न करता संविधानाची शपथ घेऊन करण्याचा निर्णय घेतला होता. घटनेची शपथ घेऊन त्यांनी त्यांचा विवाह करण्याचा निर्णय़ घेतला होता. रविवारी त्यांचा हा विवाह समारंभ झाला. स्टेजवरील एका टेबलावर बाबासाहेबांचा भीमराव आंबेडकर यांचा फोटो लावला होता. त्यावर फुलांचे हार लावलेले होते. त्यानंतर वधू आणि वर स्टेजवर आले त्यांनी बाबासाहेबांना साक्षी मानत एकमेकांना हार घातला.




वधू आणि वरांना आशीर्वाद –
या अनोख्या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या मंडपात वधू आणि वराने भारतीय घटनेची शपथ घेतली आणि दोघेही वैवाहिक बंधनात अडकले.त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मंडळींनी वधू आणि वरांना आशीर्वाद दिले. समारंभाला हजर असलेल्यांनी या अनोख्या विवाहाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो काढून व्हायरल केले आहेत.