AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर काही तासातच नववधूचा मृत्यू, वरातीऐवजी अंत्ययात्रा, नवरदेवाकडून मुखाग्नी

लग्नानंतर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना अवघ्या पाच-सहा तासातच नववधूचा अंत झाला. (Bride Dies after Wedding )

लग्नानंतर काही तासातच नववधूचा मृत्यू, वरातीऐवजी अंत्ययात्रा, नवरदेवाकडून मुखाग्नी
प्रतिकात्मक फोटो
| Updated on: May 12, 2021 | 3:43 PM
Share

पाटणा : दुर्दैवाचा दशावतार काय असावा, याचं उदाहरण नुकतंच बिहारमध्ये पाहायला मिळालं. लग्नानंतर काही तासातच नववधूचा मृत्यू झाला. त्यामुळे तिची वरात निघण्याऐवजी अंत्ययात्रा काढण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबीयांवर आली. जिच्यासोबत आयुष्य घालवण्याच्या आणाभाका घेतल्या, त्या नवरदेवानेच तिच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. (Bride Dies within hours after Wedding Groom performs last rites in Bihar)

आठवड्याभराचा सर्दी-खोकला अंगावर काढला

बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील अफजल नगर पंचायती अंतर्गत खुदिया गावात ही घटना घडली. ज्या लग्नघरात आनंदाचं वातावरण होतं, तिथे अवघ्या काही तासात स्मशानशांतता पसरली. नववधूला आठवड्याभरापासून सर्दी-खोकल्याचा त्रास सुरु होता. लग्नानंतर नववधू निशाची तब्येत आणखी बिघडू लागली. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेते, परंतु तिने अखेरचा श्वास घेतला. भाळी कुंकू लावणाऱ्या नवरदेवावरच तिला खांदा देऊन गंगा किनारी अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.

लग्नानंतर नववधूची तब्येत ढासळली

खुदिया गावातील रंजन यादव यांची कन्या निशाचा विवाह 8 मे रोजी झाला. हवेली खड़गपूर प्रखंडमधील महकोला गावात राहणाऱ्या सुरेश यादव यांचा पुत्र रवीशसोबत तिची लगीनगाठ बांधली गेली. रवीश वरात घेऊन वेळेत हजर झाला. रात्री सिंदूरदान कार्यक्रमानंतर निशाची तब्येत बिघडू लागली.

रुग्णालयात उपचार सुरु असताना अखेरचा श्वास

निशाला नातेवाईकांनी तारापूर अनुमंडल रुग्णालयात दाखल केलं. तिची परिस्थिती गंभीर असल्यामुळे उपचारासाठी भागलपूरला पाठवण्यात आले. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना अवघ्या पाच-सहा तासातच नववधूचा अंत झाला. निशाच्या निधनाच्या वृत्ताने सासर-माहेरी शोककळा पसरली. (Bride Dies after Wedding )

गंगा किनारी पतीकडून मुखाग्नी

निशाचं पार्थिव सासरी आणल्यानंतर नातेवाईक धाय मोकलून रडू लागले. नवरदेव रवीश हताश झाला होता. जिच्याबरोबर सुखी संसाराची स्वप्नं रंगवली, लग्नानंतर अवघ्या काही तासातच तिचं पार्थिव पाहून त्याला काही सुचेनासं झालं. सुलतानगंजला अंत्यसंस्कारासाठी नेले जात असताना रवीशनेच तिला खांदा दिला. गंगा किनारी तिच्या पार्थिवालाही त्यानेच मुखाग्नी दिला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेव तापाने फणफणला, अवघ्या तीन दिवसात कोरोनाने मृत्यू

तुझ्या माहेरचे 24 जण अपघातात गेले, मुलीच्या डोक्यावर अक्षता पडताच बापाचा बांध फुटला

लग्नानंतर 24 तासात नववधूला वैधव्य, कार सजवण्यासाठी गेलेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू

(Bride Dies within hours after Wedding Groom performs last rites in Bihar)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.