काश्मीर दौऱ्यातील नरेंद्र मोदींचा ट्रेन कोच होता बुलेटप्रूफ, रेल्वे फोर्स वनच्या धर्तीवरच बनवला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काश्मीर दौरा अनेक अर्थांनी महत्वाचा होता. त्यावेळी सुरक्षा संस्थांसाठी एक आव्हान होते. सुरक्षा दलाने त्याची पूर्ण तयारी केली होती. अगदी मोदी यांच्यासाठी तयार करण्यात आलेली इंस्पेक्शन कार बुलेटप्रफ होती. त्याच्यावर बॉम्बचाही परिणाम होणार नव्हता.

ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिला काश्मीर दौरा केला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा सर्वात मोठे आव्हान होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी चिनाब आणि अंजी पुलाचे लोकार्पण केल्यावर श्री माता वैष्णो देवी कटरा रेल्वे स्टेशनवर जाणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यासाठी सिंगल कोच ‘इंस्पेक्शन कार’ वापरण्यात आली. ती ‘रेल्वे फोर्स-वन’ प्रमाणे बनवण्यात आली होती. त्या ‘इंस्पेक्शन कार’वर बॉम्ब हल्लाही निकामी होणार होता.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले झाले होते. यामुळे सुरक्षा दलाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीर दौऱ्यासाठी पूर्ण काळजी घेण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने हा दौरा संवेदनशील होता. यामुळे चिनाब आणि अंजी ब्रिज दौऱ्यात सुरक्षेच्या खास उपाययोजना करण्यात आल्या. त्यासाठी अनेक महिन्यांपूर्वी पीएम स्पेशल इंस्पेक्शन कार तयार करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्ट २०२४ मध्ये युक्रेन दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी रेल्वे फोर्स वन (Rail Force One) या ट्रेनने ते पोलंडवरुन कीवला गेले होते. त्याच पद्धतीची ही पीएम स्पेशल इंस्पेक्शन कार होती.
विजेऐवजी डिझेलचा वापर कारण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या इंस्पेक्शन कारने गेले, ती विजेवर नाही तर डिझेलवर चालणारी होती. कारण कोणत्याही परिस्थितीत पॉवर फेल झाली किंवा फेल केली तरी ही कार सुरक्षित ठिकाणी पोहचू शकते. यामध्ये २५ लोकांची बसण्याची व्यवस्था होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर काही व्हिआयपी होते. इतर सर्व एसपीजी कमांडो आणि सुरक्षा अधिकारी होते. या इंस्पेक्शन कारमध्ये एक पेंट्री होती. प्रवासादरम्यान व्हिव्हिआयपी लोकांना खाण्या पिण्याच्या वस्तू देण्यासाठी ती तयार केली होती.
टनल ३५ पासून कटरा रेल्वे स्टेशनपर्यंत संपूर्ण रस्त्यात ठिकठिकाणांवर पोलीस फोर्स आणि जवान तैनात होते. संपूर्ण मार्गाची सुरक्षा एसपीजीकडे होती. एअर डिफेन्स सिस्टम पूर्णवेळ सुरु होती. ही इंस्पेक्शन कार अनेक महिन्यांच्या तयारीने इंटीग्रल रेल्वे कोच फॅक्टरीत तयार केली होती. त्यात एसपीजीच्या सूचनांनुसार वेळोवेळी बदल करण्यात आला होता.