ऐकावं ते नवलच, …म्हणून दोन सख्ख्या भावांनी केलं एकाच तरुणीसोबत लग्न, कारण ऐकूण बसेल धक्का
एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, दोन्ही भावांनी एकाच तरुणीसोबत लग्न केलं आहे, या लग्नाची आता राज्यभरात चर्चा सुरू आहे. या लग्नाचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत.

हिमाचल प्रदेशमधील सिरमौर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, इथे दोन्ही भावांनी एकाच तरुणीसोबत लग्न केलं आहे, या लग्नाची आता राज्यभरात चर्चा सुरू आहे. या लग्नाचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. दोन सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत लग्न केलं आहे, त्यांनी असं का केलं असावं? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार गावातील प्राचीन परंपरेचं पालन करण्यासाठी या दोन्ही भावांनी एकाच मुलीसोबत लग्न केल्याची माहिती समोर येत आहे.
काय आहे नेमकं कारण?
समोर आलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशमधील सिरमौर जिल्ह्यातल्या शिलाई गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 12, 13, आणि 14 जुलै असं तीन दिवस हे लग्न मोठं धुमधडाक्यात पार पडलं. लग्नाच्या दिवशी दोन्ही नवरदेव आपल्या वधूसोबत स्टेजवर दिसले, हे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं आहे. या लग्नात संपूर्ण शिलाई गाव सहभागी झालं होतं. तीन दिवस हे लग्न सुरू होतं, या लग्नाचं व्हिडीओ चित्रिकरण देखील करण्यात आलं आहे, त्यातील काही व्हिडीओ आता समोर येत आहेत.
जुन्या काळात सिरमौर जिल्हा आणि उत्तराखंडमधील काही जिल्ह्यांमध्ये एकाच महिलेसोबत अनेक पुरुषांनी लग्न करण्याची परंपरा होती. हीच परंपरा जपण्यासाठी आता या दोन्ही भावांनी एकाच तरुणीसोबत लग्न केलं आहे. या परंपरेनुसार दोन किंवा अधिक सख्खे भाऊ एकाच मुलीसोबत लग्न करू शकतात. ही परंपरा काळाच्या ओघात नष्ट झाली आहे. 70 –80 च्या दशकांमध्येच ही परंपरा नष्ट झाली होती. मात्र आता हे ताज प्रकरण समोर आलं आहे. परंपरेचं पालन करण्यासाठी दोन्ही भावांनी एकाच मुलीसोबत लग्न केलं आहे, हे लग्न आता चर्चेचा विषय ठरलं आहे.
असं मानलं जात होत की, जर समजा दोन भावांनी वेगवेगळ्या तरुंणीसोबत लग्न केलं तर घराची, जमीन आणि संपत्तीची वाटणी होईल, तिचे एकपेक्षा अधिक वाटे होतील, हे सर्व टाळण्यासाठी एकाच तरुणीसोबत घरातील सख्खे भाऊ त्या काळात लग्न करायचे, मात्र आता ही प्रथा बंद असली तरी देखील हे ताजं प्रकरण आता समोर आलं आहे.
