AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 पेक्षा जास्त मुलं करा किंवा असल्यास दर महिना दीड हजार रुपये मिळवा, कॅथॉलिक चर्चची घोषणा वादात, वाचा सविस्तर

5 पेक्षा जास्त मुलं जन्माला घाला आणि दर महिन्याला दीड हजार रुपये मिळवा, अशी ही योजना आहे. या माध्यमातून ईसाई समाजाची लोकसंख्या वाढवण्याचा कॅथॉलिक चर्चचा उद्देश आहे.

5 पेक्षा जास्त मुलं करा किंवा असल्यास दर महिना दीड हजार रुपये मिळवा, कॅथॉलिक चर्चची घोषणा वादात, वाचा सविस्तर
| Edited By: | Updated on: Jul 28, 2021 | 9:12 PM
Share

नवी दिल्ली : केरळच्या कॅथॉलिक चर्चने इसाई परिवारासाठी एका योजनेची घोषणा केलीय. मात्र, आता ही योजनाच वादात सापडली आहे. कारण, कॅथॉलिक चर्चने सुरु केलेल्या योजनेत एका कुटुंबाला 5 किंवा त्यापेक्षा जास्त मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं आहे. 5 पेक्षा जास्त मुलं जन्माला घाला आणि दर महिन्याला दीड हजार रुपये मिळवा, अशी ही योजना आहे. या माध्यमातून ईसाई समाजाची लोकसंख्या वाढवण्याचा कॅथॉलिक चर्चचा उद्देश आहे. महत्वाची बाब म्हणजे ईसाई संस्थेनं याला जनकल्याणकारी योजना म्हटलंय. (catholic church announces welfare scheme for Christian family)

एकीकडे उत्तर प्रदेशात 2 पेक्षा अधिक मुलं असण्यावर सरकारने मोठा निर्णय घेतलाय. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार पाऊल उचलत आहे. दुसरीकडे केरळमध्ये कॅथॉलिक चर्च जास्त मुलं जन्माला घालण्यास प्रोत्साहित करत त्यांना आर्थिक मदत देण्याबाबत योजना आखत आहे. मुलं ही देवाने दिलेली एक भेट असते असं म्हणत पाला बिशॉप मार जोसेफ कल्लारंगटद्वारे जारी करण्यात आलेल्या पत्रात 5 पेक्षा अधिक मुलं असलेल्या कुटुंबाला आर्थिक आणि शैक्षणिक मदतीसह अनेक योजनांची यादी दिली आहे.

कॅथॉलिक चर्चकडून कोणत्या सुविधा?

ज्या जोडप्याचं लग्न 2000 हजार सालानंतर झालं आहे आणि ज्यांच्याकडे 5 पेक्षा अधिक मुलं आहेत त्यांनी महिन्याला दीड हजार रुपयांची मदत केली जाईल. चौथ्या आणि त्यापुढील लेकरांना पाला इथल्या सेंट जोसेफ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये मोफत शिक्षण दिलं जाईल. त्याचबरोबर आई बनणाऱ्या महिलांवर मार स्लीवा मेडिसिटी रुग्णालयात मोफत उपचार केले जातील.

ईसाई समाजाची लोकसंख्या तिसऱ्या नंबरवर

या योजनेची घोषणा सोमवारी बिशॉप जोसेफ कलारागंट यांनी एका ऑनलाई बैठकीत केली आहे. केरळमधील ईसाई समाजाची लोकसंख्या कमी होत आहे. आपला वृद्धी दर कमी आहे, असं त्यांनी म्हटलंय. 2019 मध्ये जोसेफ पेरुथोत्तम यांनी लिहिलेल्या पत्रानुसार एस वेळ अशी होती की जेव्हा ईसाई समाजाची लोकसंख्या ही दुसरी सर्वात मोठी लोकसंख्या होती. मात्र, आता ती तिसऱ्या नंबरवर आली आहे.

कॅथॉलिक चर्चची योजना वादात

कॅथॉलिक चर्चकरुन सुरु करण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश ईसाई समाजाची लोकसंख्या वाढवणे हा आहे. कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे ईसाई कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ईसाई समाजाला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. एक वेळ लोकसंख्या वाढीसाठी नाही पण आहे ती लोकसंख्या अबाधित ठेवण्यासाठी ते गरजेचं असल्याचं कॅथॉलिक चर्चने म्हटलंय. दरम्यान, कॅथॉलिक चर्चची ही योजना चांगलीच वादात सापडल्याचं पाहायला मिळत आहे.

इतर बातम्या :

उत्तर प्रदेशात भीषण अपघात, बसमध्ये 135 प्रवासी झोपेत असताना काळाचा घाला, देशाला हादरवणारी घटना

मोदी-शहांकडून देशाच्या लोकशाहीवर घाव, पेगासस प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.