TV9 Exclusive : सैन्य भरती घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून FIR दाखल, कर्नलपासून कुणाकुणाची गुपितं उघड होणार?

भारतीय सैन्यामध्ये भरती घोटाळा झाल्या प्रकरणी केंद्रीय तपास संस्थेने (CBI - सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे.

TV9 Exclusive : सैन्य भरती घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून FIR दाखल, कर्नलपासून कुणाकुणाची गुपितं उघड होणार?
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 3:17 AM

नवी दिल्ली : भारतीय सैन्यामध्ये भरती घोटाळा झाल्या प्रकरणी केंद्रीय तपास संस्थेने (CBI – सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. तब्बल 3 दशकांनंतर पहिल्यांदाच सैन्यातील भ्रष्टाचारप्रकरणी सैन्याशिवाय बाहेरची संस्था तपास करत आहे. सैन्यानेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवल्याने नक्कीच या प्रकरणात अनेक मोठे मासे गुंतल्याचा अंदाज बांधला जात आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांमध्ये सैन्यातील एक कर्नलही असल्याचा आरोप आहे. सीबीआयने दाखल गेलेल्या एफआयआरमध्ये संबंधित कर्नललाही आरोपी करण्यात आलंय (CBI register FIR in Army recruitment case in India).

भारतीय सैन्य भरतीत याआधी गैरप्रकार घडले नाहीत असंही नाही. याआधीही अनेकदा अशाप्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप होत आले आहेत. मात्र, त्या त्या वेळी सैन्याने अंतर्गत विषय असल्याचं सांगत याचा तपास सीबीआयकडे सोपावणं टाळलं. यामागे सैन्यातील बडे अधिकाऱ्यांना वाचवण्याचा हेतू असल्याचेही आरोप झाले. त्यामुळेच अशा प्रकरणांची विभागीय चौकशी करुन समिती तयार करण्यात येई आणि नंतर हे प्रकरण बंद करण्यात येई.

सुरुवातीला सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रकरण सीबीआयकडे देण्यास विरोध

अखेरीस कनिष्ठ स्तरातील दोन ते चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करुन हे प्रकरण दडपलं जायचं. यावेळी मात्र भारतीय सैन्याला पाणी डोक्यावरुन जात असल्याची जाणीव झाली आणि भरती घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली. विशेष म्हणजे सुरुवातीला या प्रकरणात देखील काही वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास विरोध करत अंतर्गत समितीकडून चौकशी करण्याची मागणी लावून धरली. मात्र, या प्रकरणाचं गांभीर्य पाहता थेट संरक्षण मंत्रालयाच्या स्तरावरुन हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचे आदेश देण्यात आले.

सैन्य भरती घोटाळ्याच्या एफआयआरचं वैशिष्ट्य काय?

या संपूर्ण प्रकरणातील विशेष गोष्ट म्हणजे सीबीआय कोणत्याही प्रकरणात गुन्हा दाखल करताना एफआयआरमध्ये आरोपींची नावे उघड करत नाही. केवळ गुन्हा नोंदवून तपास सुरू करते. त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांवर आवश्यकतेनुसार आरोपींची नाव यात टाकली जातात. सैन्य भरती घोटाळ्यातील एफआयआरमध्ये मात्र यातील संशयितांची थेट नाव टाकण्यात आली आहेत. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांचाही समावेश आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरुन झालेल्या या भरती घोटाळ्याची अनेक गुपितं उघड होणार असल्याचं दिसतंय. टीव्ही 9 कडे सीबीआयने दाखल केलेली एफआयआर आहे. यानुसार या प्रकरणात फक्त दलालच नाही तर लष्करी अधिकारी-कर्मचारी, अधिकाऱ्यांचे कुटुंबीय आणि इतर नातेवाईक यांचाही पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराचा कर्नल या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे. त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये संशयित कर्नल दिल्ली कॅन्टमधील बेस हॉस्पिटलमधील सैन्य सुभेदारांकडून एक संशयास्पद पॅकेट घेताना दिसत आहे. या सुभेदाराचा मोबाईल फोनही सीबीआयने जप्त केलाय. याशिवाय कर्नलचा लॅपटॉपही जप्त करण्यात आलाय.

भरती घोटाळ्यात हवालदाराचा मुलगा थेट सैन्य अधिकारी बनला

बेंगळुरूच्या आर्मी सर्व्हिस कॅम्पच्या सार्जंटने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपल्या मुलाला गैरप्रकारे उत्तीर्ण केले. यात एनडीए आणि एसएसबीच्या काही अधिकारी-कर्मचार्‍यांची भूमिकाही संशयास्पद आहे. आतापर्यंत केलेल्या तपासणीत असेही सत्य समोर आलं आहे की भरती घोटाळ्यात अडकलेले अधिकारी, कर्मचारी आणि दलाल निर्भयपणे ऑनलाइन लाच रक्कम स्वीकारत होते. सीबीआय त्या दिशेनेही चौकशी करत आहे. या भरती घोटाळ्यात सैन्यातील दलाल, अधिकारी-कर्मचारी सापडणार आहेत. त्याचबरोबर त्यांचे सर्व नातेवाईक-घरातील सदस्यही अडकणार आहेत.

हेही वाचा :

बक्षिसाचे 20 लाख हडप करण्यासाठी कट, जम्मू-काश्मीरमधील बनावट चकमकप्रकरणी मोठा खुलासा

शोपियां बनावट चकमकप्रकरणी आरोपपत्र दाखल, 3 आरोपींमध्ये सैन्यातील कॅप्टनचाही समावेश

व्हिडीओ पाहा :

CBI register FIR in Army recruitment case in India

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.