सीबीआयचं धाडसत्र, चंदा कोचर, वेणुगोपाल धूत यांच्यासह इतरांवर गुन्हे

नवी दिल्ली : सीबीआयने आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, व्हिडीओकॉन ग्रुपचे चेअरमन वेणुगोपाल धूत आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सीबीआयने मुंबई आणि महाराष्ट्रातील चार विविध ठिकाणी छापेमारी केली. व्हिडीओकॉनच्या मुंबईतील नरिमन पॉईंटच्या मुख्यालयातही छापेमारी केल्याची माहिती आहे. 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून मिळालेल्या 3250 कोटींच्या […]

सीबीआयचं धाडसत्र, चंदा कोचर, वेणुगोपाल धूत यांच्यासह इतरांवर गुन्हे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

नवी दिल्ली : सीबीआयने आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, व्हिडीओकॉन ग्रुपचे चेअरमन वेणुगोपाल धूत आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सीबीआयने मुंबई आणि महाराष्ट्रातील चार विविध ठिकाणी छापेमारी केली. व्हिडीओकॉनच्या मुंबईतील नरिमन पॉईंटच्या मुख्यालयातही छापेमारी केल्याची माहिती आहे. 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून मिळालेल्या 3250 कोटींच्या कर्जाप्रकरणी ही छापेमारी होत आहे.

आयसीआयसीआयला धोका देत गुन्हेगारी कट रचल्याचा ठपका एफआयआरमध्ये ठेवण्यात आलाय. गुन्हेगारी कट रचून आरोपींसोबत मिळून बेकायदेशीर पद्धतीने कर्ज मंजूर केल्याचाही आरोप आहे. यापूर्वी 4 ऑक्टोबर 2019 रोजी चंदा कोचर यांनी पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर बँकेने निश्चित कालावधीपूर्वीच पद सोडण्याची मागणी मान्य करत संदीप बक्षी यांची एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली होती.

काय आहे प्रकरण?

व्हिडीओकॉन ग्रुपला 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेने 3250 कोटींचं कर्ज दिल्याचं हे प्रकरण आहे. एकूण 40 हजार कोटींच्या कर्जाचा हा एक भाग होता, जे व्हिडीओकॉनने एसबीआयच्या नेतृत्त्वात 20 बँकांकडून घेतलं होतं. 2010 मध्ये 64 कोटी रुपये न्यूपॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेड (NRPL) ला दिले. ही कंपनी धूत यांनी दीपक कोचर आणि इतर दोन नातेवाईकांसह मिळून उभी केली, असा आरोप आहे.

चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कर्जदाराकडून आर्थिक लाभ दिले गेले, असाही आरोप करण्यात आलाय. आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर सहा महिन्यातच धूत यांनी कंपनीची मालकी दीपक कोचर यांच्या ट्रस्टला केवळ नऊ लाख रुपयांमध्ये विकल्याचाही आरोप आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.