VIDEO: जम्मू-काश्मीमध्ये दहशतवाद्यांकडून CRPF वर ग्रेनेड हल्ला, 3 जण जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) बार्बर शहा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांवर ग्रेनेड हल्ला झालाय. विशेष म्हणजे ही हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झालीय.

VIDEO: जम्मू-काश्मीमध्ये दहशतवाद्यांकडून CRPF वर ग्रेनेड हल्ला, 3 जण जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 2:00 AM

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) बार्बर शहा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांवर ग्रेनेड हल्ला झालाय. विशेष म्हणजे ही हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झालीय. या हल्ल्यात 3 नागरिक जखमी झाले आहेत. श्रीनगरच्या बार्बर शाह भागात दहशतवाद्यांनी टेहाळणी करत असलेल्या सीआरपीएफ जवानांच्या पथकावर अचानक हल्ला केल्यानं एकच खळबळ उडाली. हा हल्ला नागरिकांची वरदळ असलेल्या भागात झाला. त्यामुळे त्यात जवळपास 3 सामान्य नागरिक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याशिवाय एका नागरिकाचा मृत्यूही झाल्याचं समोर आलंय (CCTV footage of the grenade attack on CRPF in Barbar Shah Srinagar Jammu and Kashmir).

वरदळीच्या भागात सायंकाळी 6 वाजता अचानक ग्रेनेड हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्बरशहा भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर ग्रेनेडने हल्ला केला. यात तीन नागरिक जखमी झाले. क्रालखुद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांचं संयुक्त पथक टेहाळणी करत असताना सायंकाळी 6 वाजता ग्रेनेड बॉम्ब फेकण्यात आला. हा बॉम्ब रस्त्याच्या कडेलाच फुटला. त्यात नागरिक जखमी झाले. यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी तात्काळ परिसराची नाकेबंदी करण्यात आली. सुरक्षा दल दहशतवाद्यांचा शोध घेत आहे.”

दहशतवादी हल्ला करुन फरार होण्यात यशस्वी

दरम्यान, याआधी पुलवामामधील (Pulwama) राजपोरा चौकातही दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी पोलीस आणि CRPF च्या संयुक्त पथकावर ग्रेनेड फेकत हल्ला केला होता. यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना गोळीबार करत प्रत्युत्तर दिले. मात्र, दहशतवादी हल्ला करुन फरार होण्यात यशस्वी झाले. या हल्ल्यात कुणालाही दुखापत झाल्याची माहिती नाही.

शोपियात एका दहशतवाद्याचा खात्मा, एकाचं आत्मसमर्पण

दक्षिण काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील हाजीपोरा भागात (Hajipora in Shopian of Kashmir) शुक्रवारी (25 जून) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यात एक दहशतवादी मारला केला. दुसरीकडे लष्करच्या दुसऱ्या दहशतवाद्यानं आत्मसमर्पण केलं. त्याच्याकडून एके 56 रायफल जप्त करण्यात आली.

दहशतवादी हल्ल्याचा व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

नांदेडमध्ये नेत्यांच्या हत्येचा कट, लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना दहा वर्षांचा कारावास

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून 2 युवकांची हत्या, सैन्याकडून परिसराची कडक नाकेबंदी

दहशतवादी संघटनेशी संबंध, जम्मू काश्मीरच्या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी

CCTV footage of the grenade attack on CRPF in Barbar Shah Srinagar Jammu and Kashmir

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.