कुत्र्यांचे हल्ले वाढले, या २३ जातींच्या कुत्र्यांच्या प्रजननावर बंदीचे पाऊल

केंद्र सरकारने 23 धोकादायक कुत्र्यांच्या जातींवर बंदी आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यात पिटबुल-जर्मन शेफर्डसह या जातींचा समावेश आहे. या कुत्र्यांच्या जातींचे प्रजनन, विक्री आणि पाळण्यास बंदी आणण्याचे निर्देश दिले आहेत.

कुत्र्यांचे हल्ले वाढले, या २३ जातींच्या कुत्र्यांच्या प्रजननावर बंदीचे पाऊल
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 9:06 AM

नवी दिल्ली | 14 मार्च 2024 : मानवावर कुत्र्यांचे हल्ले वाढत जात आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत्यूच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. यामुळे केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आता केंद्र सरकारने 23 धोकादायक कुत्र्यांच्या जातींवर बंदी आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यात पिटबुल-जर्मन शेफर्डसह या जातींचा समावेश आहे. या कुत्र्यांच्या जातींचे प्रजनन, विक्री आणि पाळण्यास बंदी आणण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र लिहिले आहे.

कुत्र्यांच्या आयातीवर बंदी

पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे मृत्यूच्या वाढत्या घटनांबाबत केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. यानंतर केंद्र शासनाच्या पशूसंवर्धन विभागाने राज्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात पिटबुल टेरियर्स, अमेरिकन बुलडॉग्स, रॉटवेलर्स आणि मास्टिफ्ससह 23 जातीच्या क्रूर कुत्र्यांच्या विक्री आणि प्रजननावर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीनेही अशा जातीच्या कुत्र्यांच्या आयातीवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. त्यानंतर हा निर्णय घेतला आहे.

कोणत्या कुत्र्यांच्या जातींवर बंदी

पिटबुल, टेरियर, टोसा इनू, अमेरिकन स्टॅफोर्डशायर टेरियर, फिला ब्राझिलियानो, डोगो अर्जेंटीनो, अमेरिकन बुलडॉग, बॉसबोएल, कांगल, सेंट्रल एशियन शेफर्ड डॉग, कॉकेशियन शेफर्ड डॉग, दक्षिण रशियन शेफर्ड डॉग, आणि टोरना या जातींच्या कुत्र्यांचे प्रजनन, विक्रीस बंदी आणली गेली आहे. ही कुत्रे घरात पाळता येणार नाही. सरप्लॅनिनॅक, जपानी टोसा, मास्टिफ्स, रॉटविलर्स, टेरियर्स, रोडेशियन रिजबॅक, वुल्फ डॉग्स, कॅनारियो, अकबाश, मॉस्को गार्ड, केन कोर्सो आणि बँडॉग हे कुत्रे या अंतर्गत येणार आहे.

हे सुद्धा वाचा

न्यायालयाने घेतली होती दखल

कुत्र्यांच्या हल्ल्यासंदर्भात दिल्ली न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यानंतर 6 डिसेंबर 2023 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. या समितीत तज्ज्ञ आणि प्राणी कल्याण संस्थांचे प्रतिविधी होते. या प्रकरणाचा अहवाल आल्यानंतर हा सल्ला देण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले.
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले.
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार.
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड.
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार.
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.