AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी : केंद्र सरकारची वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरवर मोठी कारवाई

Pooja Khedkar Dismissed : वादग्रस्त अधिकार पूजा खेडकर प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने निर्णय घेत पूजा खेडकरला मोठा धक्का दिला आहे. पूजा खेडकरला सरकारी सेवेमधून बरखास्त करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.

सर्वात मोठी बातमी : केंद्र सरकारची वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरवर मोठी  कारवाई
| Updated on: Sep 07, 2024 | 7:36 PM
Share

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकरवर केंद्र सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांना सरकारी सेवेमधून बरखास्त करण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या प्रकरणाची कोर्टात केसही सुरू आहे. पूजा खेडकरने शुक्रवारी एम्समध्ये तिच्या अपंगत्वाची तपासणी करण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. पूजाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल होता.

पूजा खेडकर हिचे नाव, तिच्या पालकांचे नाव, सही, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि पत्ता बदलून आपली ओळख खोटी करून परीक्षेला बसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर पूजा खेडकर तिच्या अधिकारांचा गैरवापर करून CSE (नागरी सेवा परीक्षा) 2022 च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.  पूजा खेडकर यांनी दोन ओळखपत्रांवर दोन वेगवेगळे पत्ते दिले आहे. त्यांना आधारकार्डवर पुण्यातील नॅशनल हौसिंग सोसायटी औंध पुणे येथील पत्ता दिला आहे तर रेशनकार्डवर आळंदी- देहू रस्ता तळवडे येथील कंपनीचा पत्ता दिला होता.

पूजा खेडकर 2020-21 मध्ये OBC कोट्यातील परीक्षेत ‘पूजा दिलीपराव खेडकर’ या नावाने बसली होती. 2021-22 मध्ये सर्व प्रयत्न पूर्ण केल्यानंतर, पूजा OBC आणि PWBD (अपंग व्यक्ती) कोट्याअंतर्गत परीक्षेला बसली. तेव्हा ‘पूजा मनोरमा दिलीप खेडकर’ हे नाव वापरले होते. यूपीएससीने पूजा खेडकर विरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी खटला सुरू केला. यानंतर पूजा खेडकरने आपली उमेदवारी रद्द करण्याच्या यूपीएससीच्या निर्णयाला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टासमोर दिलेल्या उत्तरात पूजाने दावा केला की तिने युपीएससीला तिच्या नावाने फेरफार किंवा चुकीची माहिती दिली नाही.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.