Unlock 5 Guidelines | केंद्राची सिनेमागृह सुरु करण्यास परवानगी मात्र महाराष्ट्र सरकारचा वेगळा निर्णय

Unlock 5 Guidelines | केंद्राची सिनेमागृह सुरु करण्यास परवानगी मात्र महाराष्ट्र सरकारचा वेगळा निर्णय

केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृहे 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली दिली आहे. (The Central government has allowed cinema halls to start with 50 per cent of capacity in unlock five)

prajwal dhage

| Edited By: Yuvraj Jadhav

Sep 30, 2020 | 10:47 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्रासोबतच केंद्र सरकारनेही अनलॉक-5 साठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये केंद्र सरकारने एक सीट सोडून 50 टक्के क्षमतेने सिनेमागृह सुरु करण्यास परवानगी दिलीय. केंद्राच्या गाईडलाईन्सनुसार सिनेमागृह 15 ऑक्टोबरपासून सुरु करता येतील. मात्र,महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या गाई़डलाईन्स नुसार राज्यातील सिनेमागृह बंद राहणार आहेत. (The Central government has allowed cinema halls to start with 50 per cent of capacity in unlock five)

मार्च महिन्यापासून देशातील सगळी सिनेमागृहे बंद होती. अनलॉक 5मध्ये केंद्र सरकारने सिनेमागृहे सुरु करण्यास मुभा दिली आहे. तशा सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या 15 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेने सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स सुरु करता येतील. माहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालय  याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करेल. कंटेन्मेंट झोनमध्ये अजूनही सिनेमागृहे बंदच असून त्यासाठी भविष्यात सूचना दिल्या जातील.

केंद्राची परवानगी असली तरी राज्याच्या गाईडलाईन्सनुसार सिनेमागृहे बंदच

केंद्र सरकारच्या सूचनांनुसार 15 ऑक्टोबरापासून सिनेमागृहे सुरु करता येतील, पण महाराष्ट्र सरकारच्या सूचनांनुसार सिनेमागृहे अजूनही बंदच आहेत. अनलॉक-4 मध्येही राज्य सराकरने सिनेमागृहे बंदच ठेवली ठेवली होती. यावेळीतरी सिनेमागृहे सुरु होतील, अशी अपेक्षा सिनेमागृहांच्या मालकांना होती.

सार्वजनिक कार्यक्रमांनाही केंद्राची परवानगी

केंद्र सरकारने कंटेनमेंट झोनच्या बाहेर सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास याआधीच परवानगी दिलेली आहे. अनलॉक-4 मध्ये केंद्र सरकारने सामाजिक, सांसकृतिक कार्यक्रमात 100 नागरिकांना भाग घेण्यास परवानगी दिली होती. यावेळी अनलॉक-5 मध्ये 15 ऑक्टोबरनंतर 100 पेक्षा जास्त नागरिकांना कार्यक्रमात सहभागी होता येईल. पण कार्यक्रमांचे आयोजन करताना सोशल डिस्टन्सिंग तसेच आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणेही बंधनकारक आहे.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊन-अनलॉक दरम्यान मध्य रेल्वेकडून 61,978 टन पार्सलची वाहतूक

Rajesh Tope | अनलॉक केल्यानं कोरोना रुग्ण वाढले, मास्क नसेल तर 500 रुपये दंड : राजेश टोपे

Mumbai Corona | अनलॉकनंतर मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत 20 टक्क्यांची वाढ, प्रशासनाची चिंता वाढली

(The Central government has allowed cinema halls to start with 50 per cent of capacity in unlock five)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें