AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल 1.5 रूपये आणि डिझेल 13 रूपयांनी..

इराण आणि अमेरिका युद्धात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भारतात वाढत आहेत. या युद्धाचा मोठा फटका बसला. यादरम्यानच आता केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबाबत अत्यंत मोठा निर्णय घेतला.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल 1.5 रूपये आणि डिझेल 13 रूपयांनी..
Petrol and diesel
| Updated on: Jun 01, 2026 | 6:52 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम भारतात बघायला मिळतोय. सतत पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत. सरकारने गेल्या 20 दिवसांच्या आत तब्बल चार वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली. होर्मुज खाडी बंद आहे. कच्च्या तेलाचा तुटवडा आहे. त्यामध्येच जागतिक बाजारात तेलाचे भाव वाढत आहेत. केंद्र सरकारने इराण अमेरिका युद्धात काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. यादरम्यानच एक आनंदाची बातमी पुढे येत आहे. सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढत असतानाच थेट दिलासा मिळालाय. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एटीएफसंदर्भात अत्यंत मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारने एक निवेदन जारी करून स्पष्ट केले की, 1 जूनपासून पेट्रोल, डिझेल आणि एटीएफवरील ड्यूटी काढून टाकली जाईल.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पेट्रोलच्या आयातीवर 1.5 रूपये प्रति लीटर आणि डिझेलच्या आयातीवर 13.50 रूपये प्रति लीटर कपात होऊ शकते. एविक्शन टरबाइल फ्यूलच्या आयातीवर लावलेला टॅक्स सरकारने 9.5 रूपये प्रति लीटर कमी केले. इराण अमेरिका युद्धात सतत जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये चढउतार बघायला मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून एका मागून एक मोठे निर्णय घेतले जात आहेत.

त्यापैकीच हा देखील एक निर्णय आहे. मात्र, या कपातीचा घरगुती किमतीवर परिणाम होणार नाही. कारण सरकारने घरगुती किमतीवरील टॅक्समध्ये कोणताही बदल केला नाही. विशेष म्हणजे सरकारकडून हा निर्णय अशावेळी घेण्यात आला, ज्यावेळी जागतिक बाजारात थोड्या प्रमाणात कच्च्या तेलावरील किमती कमी झाल्या.

सरकारने 27 मार्च 2026 पासून या टॅक्स सुरूवात केली होती. मात्र, आता कपात करण्यात आली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सतत बदल होत आहेत, त्यामुळे तेल कंपन्यांवर मोठा दबाव आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबले तर परिस्थिती पुन्हा व्यवस्थित होऊ शकते. दोन्ही देशात युद्ध थांबवण्याकरिता चर्चा सुरू आहे. मात्र, युद्धविरामाची घोषणा झाली नाही. परिस्थिती अधिक चिघळताना दिसत आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट