Chandigarh Municipal Corporation Election Results : भाजपला जबर धक्का, AAP ने महापौर उमेदवारालाच हरवले

चंदीगड महापालिका निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या आम आदमी पार्टीने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या मातब्बर उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव करण्यात पक्षाला यश आले आहे.

Chandigarh Municipal Corporation Election Results : भाजपला जबर धक्का, AAP ने महापौर उमेदवारालाच हरवले
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 12:38 PM

चंदीगड महापालिका निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या आम आदमी पार्टीने भाजपला मोठा धक्का दिला आहे. चंदीगडचे माजी भाजप महापौर देवेश मोदगिल यांना आपच्या जसबीर सिंह यांनी 939 मतांनी हरवले. वॉर्ड क्रमांक 23 मधून महापौर देवेश मोदगिल उभे होते. मात्र चंदीगड महापालिकेत प्रथमच उतरलेल्या AAP ने त्यांना जबरदस्त धोबीपछाड दिल्याने सर्वत्र हा चर्चेचा विषय ठरला आहे. पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालिम म्हणून महापालिका निवडणुकांकडे पाहिले जात आहे. त्यामुळे भाजपच्या प्रभावी उमेदवाराचा हा पराभव खूप काही संकेत देणारा ठरू शकतो.

महापालिकेत कुणाची सत्ता? आज निकाल

शुक्रवारी 24 डिसेंबर रोजी चंदिगड महापालिका निवडणुकीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत 60 टक्के मतदान झाले होते. आज मतमोजणी सुरु असून यात भाजपच्या माजी महापौरांचा पराभव झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. आतापर्यंत 21 जागांचा कौल समोर आला असून त्यात AAP-9, काँग्रेस 5, भाजप 6, अकाली दलाने 1 जागेवर आघाडी घेतली आहे. मतांची मोजणी अजूनही सुरुच आहे. आतापर्यंत 14 जागांची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यात भाजपने 5, काँग्रेसने 2 आणि आम आदमी पार्टीने 6 जागांवर विजय मिळवला आहे. अकाली दलाने एका जागेवर विजय मिळवला आहे. यंदा आम आदमी पार्टीने दोन्ही राष्ट्रीय पक्षांना हादरा दिल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आणखी एका माजी महापौरांचा पराभव

आम आदमी पक्षाच्या दमनप्रीत यांनी वॉर्ड क्रमांक 17 मधून भाजपचे महापौर रविकांत यांनाही हरवले आहे. चंदीगड भाजप अध्यक्ष आपला वॉर्डही वाचवू शकले नाहीत. अध्यक्ष वरूण सूद यांच्या वॉर्डातूनही आम आदमी पक्षाने विजय मिळवला. या वॉर्डात सूद यांनी स्वतः निवडणूक न लढवता युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय राणा यांना उमेदवारी दिली होती. यासोबतच वॉर्ड क्रमांक 26 मधून भाजपचे माजी महापौर राजेश कालिया यांचाही मोठा पराभव झाला. काँग्रेसच्या जतिंदर कुमार यांनी त्यांना 1440 मतांनी पराभूत केले.

भाजप-काँग्रेसच्या लढतीत यंदा आपचा प्रवेश

महापालिका निवडणुकीत भाजपने 20 जागा जिंकल्या होत्या. तर आधीच्या युतीतील पक्षाने म्हणजेच शिरोमणी अकाली दलाने एक जागा पटकावली होती. तर काँग्रेसने 12 जागांवर विजय मिळवला होता. मागील पाच वर्षात भाजप विकास कामे करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने केला आहे.

इतर बातम्या-

इतका अभ्यास बरा नाही, त्याचं ओझं झेपलं पाहिजे; संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

VIDEO: निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्याचा ठराव टिकणार का?; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान, तर्कवितर्कांना उधाण

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.