रस्त्यावर अंगठ्या विकणाऱ्या छांगूर बाबाकडे 100 कोटींची संपत्ती? आता ED करणार तपास, अवैध धर्मांतर प्रकरणात झाली होती अटक
मधपूरमध्ये आलीशान बंगला बांधल्यानंतर छांगूर बाबा त्या परिसरात डिग्री कॉलेज सुरु करणार होते. त्यासाठी बांधकामही सुरु केले होते. परंतु त्याला अटक झाल्यानंतर त्याची ही योजना बंद झाली आहे.

काही वर्षांपूर्वी रस्त्यावर अंगठ्या आणि रत्ने विकणाऱ्या व्यक्तीकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचे म्हटले जात आहे. त्या व्यक्तीचे नाव जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबा आहे. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. छांगूर बाबा आणि त्याच्या संस्थांमधून १०० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे एटीएस तपासातून उघड झाले आहे. एटीएसने छांगूर बाबा याच्याबाबत ईडीला अहवाल पाठवला आहे. आता या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार तपास होणार आहे.
अवैध धर्मांतर प्रकरणात अटक
एटीएसने छांगूर बाबाला अवैध धर्मांतर प्रकरणात अटक केली आहे. कधीकाळी रस्त्यावर आंगठ्या विकणाऱ्या या बाबाकडे चांगली संपत्ती जमा झाली. पाच ते सहा वर्षात आलीशान बंगला, लग्झरी गाड्या आणि बोगस संस्थांचा मालक बनला आहे. मधपूर गाव त्याच्या कोठीचे नेटवर्क आहे. त्या ठिकाणावरुन त्याचे संपूर्ण नेटवर्क चालते.
छांगूर बाबाचे नेटवर्क अनेक जिल्ह्यांमध्ये
छांगूर बाबाचे नेटवर्कचा शोध घेण्यासाठी एटीएसने टीम तयार केली आहे. छांगूर बाबाच्या नेटवर्कमध्ये कथिक पत्रकारसुद्धा आहे. त्यात मेहबूब, पिंकी हरिजन, हाजिरा शंकर, पैमन रिझवी (कथित पत्रकार) आणि सगीर यांचा समावेश आहे. त्यांना अटक झाल्यास टोळीच्या नेटवर्कची आणखी गुपिते उघड होणार आहे. या नेटवर्कचे अनेक सदस्य आजमगड, औरेया, सिद्धार्थनगर यासारख्या जिल्ह्यांमध्ये आहेत.
मधपूरमध्ये आलीशान बंगला बांधल्यानंतर छांगूर बाबा त्या परिसरात डिग्री कॉलेज सुरु करणार होते. त्यासाठी बांधकामही सुरु केले होते. परंतु त्याला अटक झाल्यानंतर त्याची ही योजना बंद झाली आहे. उत्तर प्रदेशातील अतिरिक्त पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) अमिताभ यश यांनी सांगितले की, जमालुद्दीन बाबाने आतापर्यंत ४० ते ५० इस्लामिक देशांमध्ये प्रवास केला आहे. बलरामपूर येथे मोठ्या प्रमाणावर संपत्ती घेतली आहे. या सर्व प्रकरणांचा तपास एटीएसकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत या प्रकरणात दोन जणांना अटक झाली आहे. छांगूर बाबाचे नेटवर्क संपूर्ण देशात असल्याचा एटीएसचा दावा आहे. त्या बाबाला विदेशातून फंडीग होत असल्याचे समोर आले आहे.
