बेकायदेशीर धर्मांतराचा सूत्रधार छांगूर बाबाचे स्विस बँक कनेक्शन, कोट्यवधींचे व्यवहार
Changur Baba: एटीएस, एनआयए आणि इतर गुप्तचर संस्था छांगुर आणि नसरीन यांच्या विदेशातील खात्यांची चौकशी करणार आहे. त्यांना फंडींग कुठून येत होते? तसेच अवैध धर्मांतरासंदर्भातील अन्य माहिती त्यांना विचारणार आहे.

बेकायदेशीर धर्मांतराचा सूत्रधार छांगूर बाबा सध्या चर्चेत आहे. त्याच्यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्याचा जवळचा सहकारी नवीन याच्या स्विस बँकेतील खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत होते. यामुळे छांगूर बाबा आणि स्विस बँक कनेक्शन समोर येत आहे. स्विस बँकेची ही शाखा शारजा येथे आहे. या शाखेतूनच पैशांचे व्यवहार होत होते. दरम्यान, एटीएसला छांगूर बाबा आणि नसरीन यांना सात दिवसांची कस्टडी मिळाली आहे. हे दोघे १६ जुलै पर्यंत एटीएसच्या कस्टडीत असणार आहे.
गँगस्टर कायद्यानुसार गुन्हा
एटीएस, एनआयए आणि इतर गुप्तचर संस्था छांगुर आणि नसरीन यांच्या विदेशातील खात्यांची चौकशी करणार आहे. त्यांना फंडींग कुठून येत होते? तसेच अवैध धर्मांतरासंदर्भातील अन्य माहिती त्यांना विचारणार आहे. एटीएसची टीम त्या दोघांना महाराष्ट्रात आणि बलरामपूर येथे घेऊन जाणार आहे. दरम्यान, बलरामपूरचे पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी सांगितले की, छांगूर आणि त्यांच्या टीमचे सदस्यांवर गँगस्टर कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांची संपत्तीही जप्त करण्यात येणार आहे.
ईडीकडूनही तपास सुरु
ईडीकडूनही छांगूर बाबाच्या संपत्तीचा तपास सुरु आहे. ईडीने बलरामपूर पोलिस, एसटीएफ आणि एटीएसकडून छांगूर बाबा आणि त्याच्या टोळीतील सदस्यांच्या बँक खात्यांबद्दल, मालमत्तांबद्दल आणि कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांबद्दल माहिती मागितली आहे. तसेच एटीएसनंतर ईडी छांगूर बाबा, नसरीन आणि नवीन आणि छांगूरचा मुलगा मेहबूब यांचीही कोठडी घेणार आहे. ईडी या चौघांची चौकशी करणार आहे. नवीन आणि नसरीन पूर्वी दुबईत एकत्र व्यवसाय करत होते. त्यांचा काय व्यवसाय आहे, त्याची माहिती घेण्यात येणार आहे.
छांगूर बाबाने बलरामपूर येथे जमीन घेतली होती. त्या ठिकाणी इस्लामिक औषध केंद्र आणि मदरसा सुरु करणार होते. छांगूर बाबा याच्याविरोधात तक्रारी मिळाल्यानंतर एटीएसने त्याला चौकशीसाठी बोलवले होते. परंतु तो चौकशीला आला नाही. छांगूर बाबाने एटीएसचा तपास थांबवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु त्या ठिकाणी त्याची याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर छांगूर बाबाला अटक करण्यात आली.
