Chhath Puja 2021: दिल्लीत यमुना नदीच्या विषारी फेसाच्या पाण्यात भाविकांनी केली छठ पुजा ! बघा फोटो

Chhath Puja 2021: दिल्लीत यमुना नदीच्या विषारी फेसाच्या पाण्यात भाविकांनी केली छठ पुजा ! बघा फोटो
Chhath puja in Delhi PTI pic

ही पुजा (chhat puja) चार दिवस चालते. खास करून उत्तर भारतात हा सण साजरा केला जातो. यातच दिल्लीमध्ये यमुना नदीचे विषारी फेसाचे (polluted yamuna river in Delhi) भयावक फोटो समोर आले, ज्यात भाविकांनी उभं राहून, स्नान करुन सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले !

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Devashri Bhujbal

Nov 08, 2021 | 7:57 PM

नवी दिल्लीः आज छठ पुजेच्या सणाला सुरुवात झाली आहे आणि देशभरात भाविकांनी नदीत स्नान करुन प्रथेनुसार धार्मिक विधी केले. ही पुजा चार दिवस चालते. खास करून उत्तर भारतात हा सण साजरा केला जातो. यातच दिल्लीमध्ये यमुना नदीचे विषारी फेसाचे भयावक फोटो समोर आले, ज्यात भाविकांनी उभं राहून, स्नान करुन सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले ! (Chhath puja festival begins in India meanwhile in Delhi women perform puja in polluted Yamuna river water)

छठपूजेच्या दिवशीचं हे यमुना नदीचं असे चित्र समोर येण्याची ही पहिली वेळ नाही. यमुनेच्या पाण्यात प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने दिल्ली सरकारने अनेकवेळा चिंता व्यक्त केली आहे, मात्र आजतागायत या समस्येवर तोडगा निघालेला नाही. आणि स्त्रीया धार्मिक विधीसाठी दरवर्षी अशा विषारी पाण्यात पुजा करतात.

वायू प्रदूषणासोबत आता जलप्रदूषणात वाढ

राजधानी दिल्लीत दिवाळीनंतर वायू प्रदूषणासोबतच आता जलप्रदूषणही झपाट्याने वाढ झालीये. यमुनेच्या पाण्यात अमोनियाची पातळी लक्षणीय वाढली आहे. कारखाने, रंगरंगोटी उद्योग, धोबी घाट आणि घरांमध्ये वापरल्या जाणार्‍या डिटर्जंट्समुळे सांडपाण्यात फॉस्फेटचे प्रमाण वाढल्याने यमुनेच्या पाण्यात विषारी फेस तयार होतो, असं मानलं जातं. विषारी पांढर्‍या फेसामुळे रोगराई पसरण्याचा धोका वाढतो. अशा लोकांना सर्वाधिक धोका असतो जे यमुनेचे पाणी स्नानासाठी वापरतात. त्यात छठ पूजेच्या पहिल्या दिवशी दिल्लीतील कालिंदी कुंजजवळ यमुना नदीत विषारी फेस आला असताना स्त्रीयांनी पूजा केली.

Other News

Narendra Modi LIVE in Pandharpur : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पालखी महामार्गांचे ऑनलाईन भूमीपूजन

पाण्याला खळखळाट, तसा भक्तिसागराच्या पाण्याला विठूनामाच्या गजराचा सुंदर नाद : मुख्यमंत्री

221 किमी ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, 130 किमी तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी 12000 कोटी; नितीन गडकरींची माहिती

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें