Narendra Modi LIVE in Pandharpur : देशात हायवे, रेल्वेरुळ, मेट्रोलाईन, नवे एअरपोर्ट उभारण्याचे काम- मोदी

| Updated on: Nov 08, 2021 | 4:56 PM

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह प्रमुख महाराज मंडळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी पंढरपुरातील रेल्वे मैदानावर भव्य असा शामियाना उभारण्यात आला आहे.

Narendra Modi LIVE in Pandharpur : देशात हायवे, रेल्वेरुळ, मेट्रोलाईन, नवे एअरपोर्ट उभारण्याचे काम- मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन होणार
पंढरपूर : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे. दुपारी 3.25 वाजता कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह प्रमुख महाराज मंडळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी पंढरपुरातील रेल्वे मैदानावर भव्य असा शामियाना उभारण्यात आला आहे. यामध्ये सुमारे 10000 लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे व्यासपीठावर महाराज मंडळींना बसण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ तयार करण्यात आले आहे, तर दुसर्‍या बाजूला मंत्री महोदय  खासदार आणि आमदार यांची देखील स्वतंत्रपणे बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Nov 2021 04:32 PM (IST)

    अन्नदाता आपल्या उन्नतीचा मोठा आधार- मोदी

    आपले सगळे वारकरी शेतकरी कुटुंबातून येतात.  गावातील गरीबांसाठी देशाकडून प्रयत्न केले जातात. सामान्यांच्या जगण्यात मोठा बदल होत आहे. भारताची संस्कृती, राष्ट्रीय एकतेला, भारताच्या आदर्शाला धरतीपूत्रच जिवंत ठेवतो. अन्नदाता समाजाला जोडतो. समाजासाठी जगतो. तुमची प्रगती तर समाजाची प्रगती. आपला अन्नदाता आपल्या उन्नतीचा मोठा आधार आहे. याच भावनेला घेऊन देश पुढे जात आहे.

  • 08 Nov 2021 04:29 PM (IST)

    देशात हायवे, वॉटरवेज, रेल्वेरुळ, मेट्रोलाईन, नवे एअरपोर्ट उभारण्याचे काम- मोदी

    देशात हेल्थ इन्फ्रास्टक्चरला बळ देण्यासाठी नवे वैद्यकीय महाविद्यालये उभारली जात आहेत. वेलनेस सेंटर उभारले जात आहेत. डिजीटल व्यवस्थांना वाढवण्यात येत आहे. देशात हायवे, वॉटरवेज, रेल्वेरुळ, मेट्रोलाईन, नवे एअरपोर्ट असे मोठे नेटवर्क उभारले जात आहे. देशातील प्रत्येक गावात ऑप्टिकल फायबर पोहोचवण्यासाठी काम केले जात आहे. या साऱ्या योजनांत आणखी गती आणि समन्वय आणण्यासाठी पीएम गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लॅनची सुरुवात केली जात आहे.

  • 08 Nov 2021 04:24 PM (IST)

    पंढरपुराला सर्वात स्वच्छ ठेवावे, सर्वांचा सहभाग महत्त्वाचा- मोदी

    मला जनतेकडून तिसरा आशीर्वाद हवा आहे. तो आशीर्वाद पंढरपूरसाठी हवा आहे. मी या ठिकाणाला सर्वात स्वच्छ तीर्थस्थळ म्हणून पाहू इच्छितो. हे काम जनतेच्या सहभागातून होईल. स्थानिक लोक स्वच्छतेची कमान त्यांच्याकडे घेतील, तेव्हाच आपण या स्वप्नाला साकार करु शकू. आपल्याला सर्वांच्या सहभागाची गरज आहे.

  • 08 Nov 2021 04:22 PM (IST)

    मोदी

    पंढरपूरने भक्तीच्या शक्तीने मानवतेची ओळख करून दिली. लोक देवाकडे काही मागायला येत नाही विठू माऊलीच्या दर्शनाने देवाचे पारणे फिटते की नाही त्यामुळेच देव युगानुयुगे कमरेवर हात ठेवून उभे आहेत भक्त पुंडलिकने आईच्या डोळ्यात देवाला पाहिलं होतं नरसेवा नारायण सेवा मानली होती आजपर्यंत आपला समाज हाच आदर्श घेऊन चालला आहे जीव मात्राची सेवा साधना मानत आहे प्रत्येक वारकरी निष्काम सेवा करत आहे अमृत कलश दान अन्न दान हे गरीबांच्या सेवाचे प्रकल्प इथे सुरू आहे आपल्याकडे आस्था आणि भक्कती राष्ट्र सेवा ाणि राष्ट्रभक्तीशी जोडलेली आहे सेवा दिंडी याचंही उदाहरण आहे सेवा दिंडी हे माध्यम आहे

    संतना नमन करतो विठोबाला नमन करतो

  • 08 Nov 2021 04:21 PM (IST)

    पदपथाच्या दोन्ही बाजूला छायादार वृक्ष लावावे- मोदी

    नरेंद्र मोदी पालखी मार्गाच्या भूमीपूजन सोहळ्यात भोलत आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूला पदपथ तयार केला जात आहे ही स्वागतार्ह बाब आहे. पण या पदपथाच्या बाजूला छायादार वृक्ष लावावेत. मी या मार्गाच्या आजूबाजूच्या गावाला या मोहिमेत भाग घेण्याचे आवाहन करतो. मला तुमचा दुसरा आशीर्वाद मागतो. या महामार्गावर शुद्ध पाण्याची व्यवस्था करा. पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. विठ्ठ्लाच्या चरणी लीन होण्यासाठी भक्त तब्बल 21 चालत असतात. अशा भक्तांसाठी प्याऊ फार उपयोगी पडतील, असे मोदी म्हणाले.

  • 08 Nov 2021 04:21 PM (IST)

    नरेंद्र मोदी

    या देशावर अनेक परकीय आक्रमणे झाले, मात्र वारी सुरु राहिली

    जगातली सगळ्यात मोठी यात्रा भरते

    आषाढी एकादशीला लाखो श्रद्धाळू, राम कृष्णचा जयघोष, करत येत असतात

    ही यात्रा वेगवेगळ्या मार्गावरून चालत येते, मात्र शेवटी एक होते, हे यात्रेचे वैशिष्ट्य

    संत तुकाराम महाराज म्हणतात, विश्व सगळं विष्णुमय आहे

    एकमेकांत ईर्षा नको

    हाच खरा धर्म

    सगळे वारकरी समान

    प्रत्येक वारकरी एकमेकांचे गुरुबंधू

    जेव्हा मी सबका साथ सबका साथ म्हणतो, त्या मागे हीच भावना प्रेरित करते

    माझे आहे पंढरी, आहे भीमेच्या तीरे

    माझे पंढरपूरचे विशेष संबंध

    गुजरात मधील द्वारका इथे येऊन मिळते

    मी काशीचा आहे आणि पंढरपुरला दक्षिणचे काशी म्हणतात

    संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ यांना या भूमीने युगसंत बनविले

    संतांच्या विचारानी देशाला समृद्ध केले

    मधुरेचे कृष्ण द्वारकात कृष्ण तर पंढरपुरात विठ्ठलाच्या रुपात येतात

    पंढरीची वारी समानतेचे प्रत्येक

    स्त्रिया आणि पुरुष एकमेकांना माऊली म्हणतात

    पंढरपूरने भक्ति शक्ती बरोबरच मानवतेचा परिचय करून दिले

    भक्त पुंडलिकने आई वडिलांच्या रुपात देवाला बघितले होते

    प्रत्येक वारकरी निष्काम काम करतो

    वारकऱ्यांना तीन गोष्टी मागत आहे

    तीन गोष्टीचा आशीर्वाद पाहिजे

    संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या दोन्ही बाजूला झाडे लावली पाहिजे

    पालखी मार्गावर गावातल्या प्रत्येकाला नेतृत्व करण्याची संधी

    रस्त्याच्या दोन्ही बाजूला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तेही शुद्ध पाण्याची व्ययस्था पायी दिल्या जाणार्‍या लोकांसाठी केली पाहिजे

    भारताच्या सगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये पंढरपूर स्वच्छ तिर्थक्षेत्र झाले पाहिजे

  • 08 Nov 2021 03:55 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी

    रामकृष्ण हरी म्हणत पंतप्रधान मोदींनी केली भाषणाला सुरुवात

    दोन दिवसांपूर्वी केदारनाथ इथे सेवा करण्याची ईश्वरकृपा मिळाली

    मला अतिशय आनंद होत आहे,

    ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाचे उद्घाटन होत आहे

    पालखी महामार्ग भागवत धर्माची पताका आणखीनच उंचावणारे

    संत ज्ञानेश्वर महाराजांचे पाच टप्प्यात तर संत तुकाराम महाराज पालखी महाराजांचे 3 टप्प्यात काम होणार

    या रस्त्यावर विशेष मार्ग करण्यात येणार

    पालखी महामार्ग विकास कामाचे माध्यम बनतील

    यासाठी काम करणार्‍या सगळ्या लोकांचे अभिनंदन

    जीवनाच्या सार्थकतेचे आभास होते

    सर्व वारकऱ्नायांना नमन करतो

    त्यांना कोटी कोटी अभिवादन करतो

    मी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतो, सर्व संतांच्या नतमस्तक होतो

  • 08 Nov 2021 03:52 PM (IST)

    मुख्यमंत्री

    मी जाहीर वचन देतो महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही पावलावर कमी राहू देणार नही. प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत राहू मी स्वत वारीचं दर्शन घेतलं आहे. काही वर्षांपूर्वी मी या वारीची फोटोग्राफी हेलिकॉप्टरमधून केलं. विराट दर्शन म्हणजे काय हे मला दिसलं डोळ्यात मावत नव्हतं एवढं मोठं दर्शन होतं पालख्या सागराकडे वाहत आहेत असं वाटत होतं. नद्या जिथे येतात

    वाखरी ते पंढरपूर हा मार्ग करण्याचा निर्णय घेतला ही मोठी गोष्ट पालखीचा अनुभव मी पायी सुद्धा घेतला आहे. आपण वेगळ्या दुनियेत राहतो वारकरी समाज त्याच्या पलिकडे गेला आहे देहभान हरपून जाणं म्हणजे काय त्याचा अनुभव तिकडे येतो वारकरी संप्रदायाने आपल्याला खूप काही दिले आहे. दिशा संस्कृती दिली आहे. प्रतिकूल कालखंडात अनेक शतके ऊन वारा पाऊस यवनी आक्रमणही झेलून वारीची परंपरा आपल्या संप्रदायाने सुरू ठेवली हे काम करण्यासाठी विठू माऊली आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र सरकार या कार्यात प्रत्येक पावली तुमच्यासोबत राहील

  • 08 Nov 2021 03:48 PM (IST)

    पंढरपूर

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पालखी महामार्गांचे ऑनलाईन भूमीपूजन

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भरतसिंग कोश्यारींची ऑनलाईन उपस्थिती

    व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस, नितिन गडकरी उपस्थित

  • 08 Nov 2021 03:42 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    नितीनजी आपण पुण्यकाम हाती घेतलं आहात

    गेल्या अनेक वर्षापासून उन, वारा, पाऊस सहन करत वारकरी येत असतात

    त्यांना सेवा देणे आपले काम

    महाराष्ट्र सरकार पदोपदी तुमच्यासोबत आहे

    वाखरी ते पंढरपूर मार्ग मोठे करण्याचा निर्णय चांगला घेतला

    पालखी मार्गामुळे वारकऱ्यांचा मार्ग सुकर

    भक्तीमार्गावरून आतापर्यंत वाटचाल सुरु आहे तो मार्ग सुकर होण्यासाठी प्रयत्न केलेत

    परकीय आक्रमण झाल्यानंतर सुद्धा वारी सुरू राहिली

    पुढील कार्यासाठी, काम लवकर होण्यासाठी, महाराष्ट्र सरकार पुढाकार घेईल

  • 08 Nov 2021 03:40 PM (IST)

    नितिन गडकरी

    पालखी मार्ग बनविताना ,टाइल्स ,गवत असेल

    महाराष्ट्र सरकारने यातही योगदान द्यावे

    पुन्हा एकदा संतांच्या या भूमीत संतांनी मुळ्याधिष्ठित जीवन पद्धती दिली

    मुख्यमंत्र्यांची तब्येत खराब असताना सुद्धा सहभागी झाले त्याबद्दल आभार

  • 08 Nov 2021 03:37 PM (IST)

    नितिन गडकरी

    चारधाम , 50 धार्मिकस्थळे भारतामध्ये समावेश करण्यात आले

    वर्षभर कधीही गंगोत्री, बद्रीनाथ जाऊ शकाल

    मानस सरोवरचा मार्ग करण्याचा प्रयत्न सुरू आहे

    तुळजापूर ,शेगाव, कोल्हापूर येथील भक्तीमार्ग पूर्ण करण्याचा पर्यत केला आहे

    221 किमी ज्ञानेश्वर पालखी महामार्गाला 7 हजार कोटी

    संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी 5 हजार कोटी

    मुख्यमंत्र्यांना पालखी तळासाठी विचार करावी ही विनंती

  • 08 Nov 2021 03:31 PM (IST)

    नितिन गडकरी

    सगळ्या संतांना हाथ जोडून अभिवादन करतो

    महाराष्ट्र ही संतांची भूमी

    पंढरपूर हे मोठे प्रेरणास्थान

    वारकरी अनवाणी चालत येत असतात, त्यांच्या सेवेसाठी पालखी महामार्ग होत आहे हे माझे भाग्य

  • 08 Nov 2021 03:30 PM (IST)

    पंढरपूर

    नितीन गडकरी बोलत आहेत जय श्रीराम चा जयघोष

  • 08 Nov 2021 03:29 PM (IST)

    पंढरपूर भूमीपूजन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी

  • 08 Nov 2021 03:19 PM (IST)

    पंढरपूर

    घोंगडी, टाळ, आणि तुळशीचे हार ,वीणा ,देऊन गडकरींचे स्वागत प्रशांत परिचारक, समाधान अवताडे, पालकमंत्री दत्तात्रय भरणेंनी केले गडकरींचे स्वागत

  • 08 Nov 2021 03:17 PM (IST)

    थोड्याच वेळात मुख्यमंत्री ,पंतप्रधान ऑनलाईन उपस्थित राहणार

    प्रातिनिधिक स्वरूपात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी देवस्थानचे योगेश देसाई यांचे गडकरी यांच्या हस्ते स्वागत

    थोड्याच वेळात मुख्यमंत्री ,पंतप्रधान ऑनलाईन उपस्थित राहणार

  • 08 Nov 2021 03:16 PM (IST)

    पालखी मार्ग भूमिपूजन कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दाखल

    पंढरपूर

    पालखी मार्ग भूमिपूजन कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दाखल

    सोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

    केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के सिंग ,

    पालकमंत्री दत्तात्रय भरणे ,

    भाजप प्रदेश्याध्यक्ष चंद्रकांत पाटील

    भाजप आमदार खासदार उपस्थित

    (व्हीसी वरून --पंतप्रधान नरेंद्र मोदी , मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार )

Published On - Nov 08,2021 3:07 PM

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.