AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता थेट युद्ध? चीनने 13 फायटर जेट अन् 6 जहाजं पाठवले, जगभरात खळबळ

चीन आणि अमेरिकेमध्ये सध्या एक नवं व्यापार युद्ध सुरू झालं आहे, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये सध्या प्रचंड तणाव निर्माण झाला आहे, या तणावामध्येच आता मोठी बातमी समोर आली आहे, या बातमीमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

आता थेट युद्ध? चीनने 13 फायटर जेट अन् 6 जहाजं पाठवले, जगभरात खळबळ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2025 | 8:16 PM
Share

चीनकडून अमेरिकेला रेअर अर्थ मिनिरल्सची निर्यात केली जात होती, मात्र ही निर्यात थांबवण्याचा निर्णय चीनने घेतला आहे, याचा सर्वात मोठा फटका हा अमेरिकेला बसला आहे. कारण अमेरिका रेअर अर्थ मिनिरल्ससाठी पूर्णपणे चीनवरच अवलंबून आहे, हा धक्का अमेरिका पचवतो न पचवतो तोच चीनने दुसरा मोठा धक्का अमेरिकाला दिला तो म्हणजे चीन हा अमेरिकेत उत्पादीत होणाऱ्या सोयाबीनचा सर्वात मोठा खरेदीदार देश होता. मात्र चीनने आता ही सोयाबीनची खरेदी पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या या दोन निर्णयांमुळे चिडलेल्या ट्रम्प यांनी अखेर मोठी घोषणा केली, अमेरिकेनं चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावला. चीन आणि अमेरिकेत सुरू झालेल्या या व्यापार युद्धामुळे वातावरण तापलेलं असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनं जगभरात खळबळ उडाली आहे.

चीन पुन्हा एकदा तैवानवर आक्रमण करण्याचा स्थितीमध्ये आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार चीनी सैन्यांनी 13 फायटर जेट, आणि सहा नौवदलाचे जहाज तैवानच्या आसपास तैनात केले आहेत. यातील आठ लढाऊ विमानांनी तर तैवानच्या जलडमरूची मध्य रेखा पार करून तैवानच्या दक्षिण -पश्चिम आणि दक्षिण पूर्वेच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी केल्याचा दावा देखील संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. आम्ही या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं देखील तैवानच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.

काय आहे संरक्षण मंत्रालयाचा दावा

तैवानच्या संरक्षण मंत्रालयानं या संदर्भात आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चीनी सैन्याचे तेरा लढाऊ विमानं आणि सहा नौदलाचे जहाजं तैवानच्या हद्दीच्या जवळ पाहाण्यात आले आहेत. आमचं सैन्यांची या जहाजांवर आणि विमानांवर करडी नजर आहे. त्यांनी आमच्या हवाई क्षेत्रात घुसरखोरी देखील केली आहे, परिस्थिती यापेक्षा अधिक गंभीर बनल्यास आम्ही त्यांना योग्य ते उत्तर देऊ आमचं सैन्यदल त्यासाठी तयार आहे. चीनकडून तैवानवर सातत्यानं सैन्य दबाव निर्माण केला जात आहे, त्याचा एक भाग म्हणून चीनच्या या हालचालींकडे पाहिलं जात आहे. यापूर्वी देखील चीनने असा प्रयत्न केला आहे, मात्र यामुळे युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.