AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीननं पुन्हा भारताच्या पाठीत खंजीर खुपसला, चायनाचा भयानक कट समोर, जगभरात खळबळ

अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर आता चीन आणि भारताची मैत्री हळहळु वाढताना दिसत आहे, मात्र आता जी माहिती समोर आली आहे, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण होऊ शकतो, एका रिपोर्टमुळे खळबळ उडाली आहे.

चीननं पुन्हा भारताच्या पाठीत खंजीर खुपसला, चायनाचा भयानक कट समोर, जगभरात खळबळ
शी जिनपिंगImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 19, 2025 | 9:53 PM
Share

शांघाय सहकार्य संघटना (SCO) च्या शिखर परिषदेनंतर भारत आणि चीनमधील संबंध आता हळुहळु सुधारत असल्याचं पहायला मिळत आहे. याचदरम्यान आता अमेरिकन काँग्रेसची सल्लागार असलेल्या एका संस्थेकडून चीन आणि पाकिस्तानसंदर्भात खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली होती, भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवाद्यांचे ठिकाणं उद्ध्वस्त झाले होते. भारताच्या या एअर स्ट्राईकमध्ये जवळपास शंभर दहशतवादी मारले गेले. भारतानं आपल्या या एअर स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं.

दरम्यान ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष वाढला, पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याला भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारतानं या लढाईमध्ये आपल्या सुदर्शन आणि ब्रह्मोस सारख्या मिसाईलची ताकद जगाला दाखवून दिली. तर दुसरीकडे पाकिस्तानने भारतीय वायुदलाचे राफेल लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला होता.

आता याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे, यामुळे खळबळ उडाली आहे. अमेरिकेकडून मोठा दावा करण्यात आला आहे, अमेरिकेकडून प्राप्त रिपोर्टनुसार पाकिस्ताने भारताचं एकही लढाऊ विमान पाडलं नसल्याची माहिती समोर आली आहे. तसचे या रिपोर्टमध्ये असं देखील म्हटलं आहे की, पाकिस्तानकडून भारताचं राफेल विमान पाडण्याचा जो दावा करण्यात येत आहे, त्यामागे एक मोठं कट कारस्थान होतं, चीनचा हा भारताविरोधातील डाव होता, चीनकडून भारताच्या राफेल लढाऊ विमानाला बदनाम करण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा दावा या संस्थेच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे, यासाठी चीनकडून अनेक फेक सोशल मीडिया अकाऊंटस तयार करण्यात आले, पाकिस्तानचा हा दावा खरा ठरवण्यासाठी चीनने एआय तंत्रज्ञानाचा वापर केला, असा दावा देखील या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे, हा रिपोर्ट समोर येताच जगभरात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानने भारताचं एकही लढाऊ विमान पाडलं नाही, हा चीनचा कट होतो, असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.