AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’चं 2 फेब्रुवारीला उद्घाटन, चिन्ना जियार स्वामींकडून सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांना निमंत्रण

रामानुज संप्रदायाचे सध्याचे आध्यात्मिक प्रमुख त्रिदंडी चिन्ना जियार स्वामी यांनी सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांना श्री रामानुजाचार्य स्वामी यांच्या 1 हजाराव्या जयंती निमित्ती रामानुज सहस्त्राब्दी समारोहासाठी निमंत्रण दिलं आहे. यावेळी चिन्ना जियार स्वामी यांच्यासह माय होम ग्रुपचे चेअरमन डॉ. रामेश्वर रावही उपस्थित होते.

'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी'चं 2 फेब्रुवारीला उद्घाटन, चिन्ना जियार स्वामींकडून सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांना निमंत्रण
सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना निमंत्रण देताना चिन्ना जियार स्वामी. सोबत माय होम ग्रुपचे चेअरमन डॉ. रामेश्वर राव (डावीकडे)
| Edited By: sagar joshi | Updated on: Sep 17, 2021 | 11:53 PM
Share

नवी दिल्ली : रामानुज संप्रदायाचे सध्याचे आध्यात्मिक प्रमुख त्रिदंडी चिन्ना जियार स्वामी यांनी सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांना श्री रामानुजाचार्य स्वामी यांच्या 1 हजाराव्या जयंती निमित्ती रामानुज सहस्त्राब्दी समारोहासाठी निमंत्रण दिलं आहे. यावेळी चिन्ना जियार स्वामी यांच्यासह माय होम ग्रुपचे चेअरमन डॉ. रामेश्वर रावही उपस्थित होते. यावेळी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचं उद्घाटनही होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे जगातील दुसऱ्या सर्वांत उंच प्रतिमेचं उद्घाटन करणार आहे. त्याचबरोबर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. (Chinna Jiyar Swamy invites CJI N.V. Ramana for the inauguration ceremony of the Statue of Equality)

श्री रामानुजाचार्य स्वामी यांची 216 फुटी भव्य प्रतिमा

श्री रामानुजाचार्य स्वामी यांच्या आठवणी जागवण्यासाठी आणि सन्मानासाठी मोठ्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हैदराबादजवळ शमशाबादमध्ये निर्मित एका मोठा आश्रमात त्यांच्या प्रतिमेच्या अभिषेकासह 1000 व्या वार्षीक सोहळ्याला सुरुवात होईल. स्वामींची 216 फूट उंच प्रतिमा बनवण्यात आली आहे, जी जगातील दुसरी सर्वाच उंच प्रतिमा आहे. रामानुजाचार्यांच्या सर्व भक्तांची आपल्या देवतांची पूजा करण्याच्या अधिकारांची रक्षा करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मूर्तीला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं संबोधलं जात आहे.

CJI N V Ramana

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना निमंत्रण देताना चिन्ना जियार स्वामी. सोबत माय होम ग्रुपचे चेअरमन डॉ. रामेश्वर राव (उजवीकडे)

लोककल्याणासाठी महायज्ञाचं आयोजन

सहस्रहुंदात्माका लक्ष्मी नारायण यज्ञ लोककल्याणासाठी केला जाणार आहे. या मेगा इव्हेंटसाठी बांधण्यात आलेल्या 1,035 होम कुंडांमध्ये सुमारे दोन लाख किलो गाईचे तूप वापरण्यात येणार आहे. मुचिंतल येथील विस्तीर्ण आध्यात्मिक सुविधा “दिव्य साकेत” लवकरच जगप्रसिद्ध आध्यात्मिक ठिकाण म्हणून उदयास येईल. हे चिन्ना जीयर यांचे स्वप्न असल्याचं त्यांनी सांगितलं. तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च करून हा मेगा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुतळ्याच्या बांधकामात 1800 टन लोखंड वापरला आहे. तर उद्यानाभोवती 108 दिव्यदेश किंवा मंदिरे बांधलेली आहेत.

CJI N V Ramana

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना निमंत्रण देताना चिन्ना जियार स्वामी. सोबत माय होम ग्रुपचे चेअरमन डॉ. रामेश्वर राव (उजवीकडे)

कोण आहेत रामानुजाचार्य?

रामानुजाचार्य यांचा जन्म 1017 मध्ये तमिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे कांतीमाती आणि केसावाचार्युलू यांच्याकडे झाला. भक्तांचा असा विश्वास आहे की हा अवतार स्वतः देवाच्या आदेशानं घेतला आहे. त्यांचे शिक्षण कांची अद्वैत पंडितांच्या मार्गदर्शनाखाली वेदांत मध्ये झालं. त्यांनी विशिष्ठद्वैत विचारधारा स्पष्ट केली आणि मंदिरांना धर्माचे केंद्र बनवले. रामानुजांना यमुनाचार्यांनी वैष्णव दीक्षामध्ये प्रवेश दिला. त्यांचे आजोबा अलावंदरू हे श्रीरंगम वैष्णव मठाचे धर्मगुरू होते. ‘नंबी’ नारायणाने रामानुजाला मंत्र दीक्षाचा उपदेश केला. तिरुकोष्टियारूंनी ‘द्वैय मंत्रा’चे महत्त्व समजावून सांगितले आणि रामानुजम यांना मंत्राचं गुपीत राखण्यास सांगितलं. रामानुजाला वाटले की ‘मोक्ष’ हा काही लोकांपुरता मर्यादित राहू नये. त्यामुळे तो पुरुष आणि स्त्रियांना सारख्याच पवित्र मंत्राची घोषणा करण्यासाठी श्रीरंगम मंदिर गोपुरम वर चढला.

रामानुजाचार्य स्वामी यांनी दलित लोकांना उच्चभ्रूंच्या बरोबरीने वागले. त्यांनी समाजात अस्तित्वात असलेल्या अस्पृश्यता आणि इतर दुर्गुणांचा नायनाट केला. त्यांनी प्रत्येकाला देवाची उपासना करण्याचा समान विशेषाधिकार दिला. अस्पृश्य म्हणवल्या जाणाऱ्या लोकांना त्यांनी “तिरुकुलाथर” असं संबोधलं. याचा अर्थ “जन्माला आलेला देव” आणि त्यांना मंदिराच्या आत नेले. त्यांनी भक्ती चळवळीचे नेतृत्व केले तसंच तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला.

इतर बातम्या :

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचं ‘सेवा व समर्पण’ अभियान, कुठे कोणता उपक्रम?

’50 वर्षे वय झालं तरी त्यांना राज्यमंत्रीच ठेवलं’, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सतेज पाटलांना टोला

Follow Us
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?