पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचं ‘सेवा व समर्पण’ अभियान, कुठे कोणता उपक्रम?

सेवा व समर्पण अभियानानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर आधारीत छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचं 'सेवा व समर्पण' अभियान, कुठे कोणता उपक्रम?
मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचं सेवा व समर्पण अभियान
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 11:18 PM

मुंबई : गरजूंना धान्य वाटप, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संपर्क अशा विविध उपक्रमांनी भारतीय जनता पार्टीच्या सेवा व समर्पण अभियानाला राज्यात प्रारंभ करण्यात आला. अभियानानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर आधारीत छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. (Maharashtra BJP launches service and dedication campaign on the occasion of PM Modi’s birthday)

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करून गरीब कल्याणाचा संकल्प प्रत्यक्षात आणला आहे. यावेळी राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, अभियान प्रमुख राज पुरोहित, प्रदेश सचिव संदीप लेले, महिला मोर्चा अध्यक्ष उमा खापरे, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी उपस्थित होते.

औरंगाबाद, नाशिक, नागपूर, मुंबईत विविध उपक्रम

औरंगाबाद येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते बियाणांचे वितरण करण्यात आले. नाशिक येथे नवजात बालकांपासून ते 18 वर्ष वयापर्यंतच्या लाभार्थीसाठी आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यावेळी उपस्थित होत्या. नागपूर येथे महानगर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते यांच्या उपस्थितीत गरजूंना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. मुंबईत माटुंगा येथील डेविड ससून चिल्ड्रेन स्कूलमधील मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.

पुण्यात केंद्राच्या 52 योजनांबाबत प्रबोधन

पुणे शहरात पंतप्रधान आवास योजना, उज्वला गॅस योजना, आयुष्यमान भारत योजना इत्यादी सुमारे 52 योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना घेता यावा यासाठी प्रबोधन केले जाणार आहे. त्याचा प्रारंभ खा. गिरीश बापट यांच्या हस्ते झाला. 1 कार्यकर्ता 25 लाभार्थी हे अभियान संपूर्ण पुणे शहरात राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे व त्यांच्या लोकसेवक कारकीर्दीला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान चालणार आहे.

भाजपचं ‘सेवा आणि समर्पण अभियान’

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी अलिकडेच एका बैठकीत हे अभियान कसं असेल हे सांगितलं होतं. त्यातले प्रमुख मुद्दे असे-

1.पंतप्रधान मोदींचा फोटो असलेल्या 14 कोटी राशन बॅग वाटण्यात येतील. यात पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत 5 किलो राशन ह्या बॅगेत असेल. विशेष म्हणजे भाजपशासित राज्यात आतापर्यंत 2.16 कोटी बॅग वाटण्यात आल्यात.

2. कोरोना महामारीच्या काळात मोदींची मदत झाली, त्यामुळे त्यांना धन्यवाद देणारे व्हिडीओ दाखवले जाणार. यात गरीबांचे मसिहा मोदीजी असा संदेश असेल.

3. देशभरातून बूथ लेवलवरुन थँक्यू मोदीजी असं लिहिलेलं 5 कोटी पोस्टकार्ड त्यांना पाठवले जातील.

4. मोदींचा हा 71 वाढदिवस आहे, त्यामुळे 71 ठिकाणी नद्यांची साफसफाई अभियान राबवलं जाईल.

5. ज्यांना कोरोनाची लस दिली गेलीय, त्यांनी थॅक्यू मोदीजी म्हटलेले व्हिडीओ प्रसारीत केले जातील.

6.मोदींच्या राजकीय प्रवासावर व्हिडीओ दाखवला जाईल. राज्य आणि जिल्हा स्तरावर मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल. सेमिनारही असतील.

7. प्रसिद्ध लेखक, कवी यांच्याकडून मोदींची स्तुती करणारं साहित्य उपलब्ध केलं जाईल. यात प्रादेशिक भाषेतले लेखकही असतील.

8. कोरोनाकाळात जी मुलं अनाथ झालीत, त्यांना पीएम केअर फंडातून मदत देण्यासाठी नोंदणी अभियान चालवलं जाईल.

9. पंतप्रधान मोदींना अनेक सन्मानचिन्हं आणि प्रतिमा मिळालेल्या आहेत, त्याच्या निलामीबद्दल लोकांना सांगितलं जाईल.

10. वृद्धांना भोजन वाटप, त्यांच्या प्रकृतीची मोफत तपासणी, ब्लड डोनेशन कँप याचेही आयोजन केलं जाईल.

11. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती तर 25 सप्टेंबरला दीनदयाल उपाध्याय जयंती आहे. भाजप कार्यकर्त्यांना बूथ लेव्हलवर ह्या दोन दिवशी रचनात्मक कार्य करायला सांगितलं जाईल.

इतर बातम्या :

’50 वर्षे वय झालं तरी त्यांना राज्यमंत्रीच ठेवलं’, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सतेज पाटलांना टोला

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास लिहिण्यासाठी शासनस्तरावर निर्णय घेतला जाणार – धनंजय मुंडे

Maharashtra BJP launches service and dedication campaign on the occasion of PM Modi’s birthday

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.